सिंधुदुर्गातील मोर्लेत हत्तींचा धुमाकूळ, बागायतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:29 AM2019-05-14T11:29:41+5:302019-05-14T12:56:20+5:30

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हत्तींची दहशत निर्माण झाली असून घोटगेवाडी पाठोपाठ मोर्ले गावातही रानटी हत्तींनी उच्छाद मांडला आहे.

elephant destroy crops in morle sindhudurg | सिंधुदुर्गातील मोर्लेत हत्तींचा धुमाकूळ, बागायतीचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोर्लेत हत्तींचा धुमाकूळ, बागायतीचे नुकसान

Next
ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. घोटगेवाडी पाठोपाठ मोर्ले गावातही रानटी हत्तींनी उच्छाद मांडला आहे. सोमवारी रात्री हत्तींनी येथील बागायतींचे नुकसान केले.

सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हत्तींची दहशत निर्माण झाली असून घोटगेवाडी पाठोपाठ मोर्ले गावातही रानटी हत्तींनी उच्छाद मांडला आहे. सोमवारी रात्री हत्तींनी येथील बागायतींचे नुकसान केले आहे. 

स्थानिक ग्रामस्थ गणपत मोर्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींनी बाबुराव मसुरकर, विजय रेडकर, नितीन मोर्ये आदींच्या काजू, केळी व माड-सुपारी बागायतींचे सोमवारी रात्री उशिरा नुकसान केले. मंगळवारी सकाळी महेश चिरमुरे यांनी मोर्लेतील श्री सातेरी मंदिराजवळच्या जंगलात हत्तींना पाहिले. या ठिकाणी महामार्गाचे काम चालू आहे. हत्तींनी नुकसान केल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मोर्ले गावाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हत्ती मानवी वस्तीजवळ येऊन पोहोचल्याने तिलारी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: elephant destroy crops in morle sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.