कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

By admin | Published: June 14, 2017 10:53 PM2017-06-14T22:53:17+5:302017-06-14T22:53:17+5:30

कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

Eleven bogus doctors in Kankavli taluka | कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : तालुक्यातील हुंबरठ तिठा येथील धन्वंतरी क्लिनिकचे सुरेश गणपती शिंदे व पियाळी येथील मूळव्याध दवाखान्याचे गोपाळ गुरूप्रसाद राय या दोन बोगस डॉक्टरांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी पथकाला आणखी नऊ डॉक्टर दोषी आढळले असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने १३ मार्च २0१७ ला परिपत्रक काढून बोगसडॉक्टरांविरोधात धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी उदय चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी एक तपासणी पथक नियुक्त करण्यात आले होते.
कणकवली तालुक्यातील हुंबरट तिठा येथील धन्वंतरी क्लिनिकचे सुरेश शिंदे व पियाळी येथील मूळव्याध दवाखान्याचे गोपाळ राय यांच्या दवाखान्यांची पथकाने ४ एप्रिल व ५ एप्रिल २0१७ रोजी तपासणी केली. या तपासणीत सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याकडे बोगस सर्टिफिकेट आढळून आली. आपण डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचे तपासणी पथकाला आढळले. याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी कणकवली पोलिसात माहिती दिली. कणकवली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची चर्चा सुरू होती. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणीही रुग्णांनी केली होती. हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीविताशी खेळत असल्याच्या तक्रारी तपासणी पथकाकडे प्राप्त झाल्या होत्या.
कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने तालुक्यातील १२0 दवाखान्यांची तपासणी केली. त्यात ९ जण दोषी आढळले. यापैकी गंभीर तक्रारी असलेल्या सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याविरोधात पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी मेडिकल अ‍ॅक्टनुसार सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पवार करीत आहेत.

Web Title: Eleven bogus doctors in Kankavli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.