महाआरतीद्वारे मंदिरासाठी एल्गार :प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 07:02 PM2020-10-26T19:02:58+5:302020-10-26T19:04:20+5:30
bjp, pramod jathar, temple, shindhudurgnews महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स व लॉजे सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणे दुर्दैव आहे. त्यामुळे आता महाआरतीच्या एल्गारानेच सरकारला मंदिरे उघडायला भाग पाडूया, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना पत्राद्वारे केले आहे.
कणकवली : महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स व लॉजे सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणे दुर्दैव आहे. त्यामुळे आता महाआरतीच्या एल्गारानेच सरकारला मंदिरे उघडायला भाग पाडूया, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना पत्राद्वारे केले आहे.
जठार म्हणतात, महाराष्ट्रात आज जर काँग्रेसचा मुख्यमंत्री असता आणि शिवसेना विरोधी पक्षात असली असती तर मंदिरांबाबत त्यांची हीच भूमिका असली असती का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे. आघाडीतल्या पक्षांच्या इच्छेनुसार इथे महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स आणि लॉज सुरू होतात. ज्या जगदंबेचे नाव घेत छत्रपती शिवरायांनी मंदिरांना सन्मान देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केले, त्याच महाराष्ट्रात नवरात्राच्या पवित्र वातावरणातही आज मंदिरे बंद आहेत. त्याच आई जगदंबेच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ह्यदार उघड बये दार उघडह्ण म्हणत टाहो फोडायची वेळ या ठाकरे सरकारने आणली आहे.
केवळ स्वतःच्या सत्तेसाठी पांघरलेला हा शिवसेनेचा स्वार्थी दुटप्पीपणा उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता एल्गार पुकारला पाहिजे. आता याला एकच पर्याय. जोपर्यंत भाविकांची श्रद्धास्थाने असलेली ही मंदिरे उघडली जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात, शहरा शहरात मंदिरांच्या बाहेर रस्त्यावर महाआरतीची आता सुरुवात करावी लागेल, असेही पत्रात म्हटले आहे.