कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:24 PM2021-01-08T14:24:40+5:302021-01-08T14:27:06+5:30

Collcatror Kankavli Sinhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

Emphasize increasing corona recovery rate: K. Manjulakshmi | कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी

कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी

Next
ठळक मुद्दे कोरोना रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या : के. मंजुलक्ष्मी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मृत्यूदर हा राज्यातील मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सावंतवाडी तालुक्यात मृत्यूदर जास्त आहे. त्याची कारणे शोधून त्याचा अभ्यास करावा, सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे तसेच ज्या रुग्णांना घरी सोडले जात आहे, त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा.

परदेशातून येणाऱ्यांची माहिती गोळा करावी

कोविड केअर सेंटर येथे किमान कर्मचारी उपलब्ध करून द्यावे. नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्यासाठी योग्य तो समन्वय ठेवावा. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी.

गर्दीच्या ठिकाणांवरील व्यापारी तसेच रिक्षाचालक, बसचालक, हॉटेलमधील कर्मचारी यांची कोविडची चाचणी करण्यासाठी संबंधित संघटनांशी चर्चा करून तसे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. यावेळी लसीकरण नियोजनाचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच माकड तापाचाही आढावा घेण्यात आला.

Web Title: Emphasize increasing corona recovery rate: K. Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.