परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:07 PM2020-08-25T16:07:23+5:302020-08-25T16:09:05+5:30

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Employee problems learned by Transport Minister! | परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या !

हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या चालक व वाहकाशी हितगूज साधले.

Next
ठळक मुद्देपरिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या ! हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी भेट

कणकवली : सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गेले तीन दिवस मंत्री अनिल परब सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याठिकाणी रविवारी ते वास्तव्यास होते.

याच दरम्यान फोंडा ते मोहुळ (हरकुळ खुर्द) ही एसटीची गाडी घेऊन दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चालक अजित राणे व वाहक साळवी गेले होते. गावात ही एसटी पोहोचताच मंत्री अनिल परब यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी या चालक व वाहकांना श्री गणेशाचे दर्शन घेण्यास निवासस्थानी येण्याची विनंती केली. त्यामुळे ते दोघे तिथे गेले. यावेळी मंत्री अनिल परब यांचीही तिथे भेट झाली.

यावेळी मंत्री अनिल परब यांनी या दोन्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. तसेच समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे एसटीचे वाहक प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरत असलेल्या मशीनचीही पाहणी केली. मंत्र्यांच्या या आपुलकीने दोन्ही कर्मचारी भारावून गेले.



 

Web Title: Employee problems learned by Transport Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.