अवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:31 AM2019-05-11T11:31:37+5:302019-05-11T11:33:08+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.

Enactment of stringent law for illegal operation of the LED fishing | अवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावा

अवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावा

Next
ठळक मुद्देअवैध चाललेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करावालक्ष वेधले : केसरकर, नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची मंत्रालयात घेतली भेट

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा करा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.

एलईडी मासेमारीच्या प्रश्नासंदर्भात आज पालकमंत्री केसरकर, आमदार नाईक यांनी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची भेट घेत लक्ष वेधले. यावेळी अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या एलईडी बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी एलईडी मासेमारी विरोधातील कायद्यात बदल करण्याबाबत चर्चा झाली.

यावर अनुपकुमार यांनी एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र, राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आहे.

मासळीची बेसुमार लूट होत असल्याने आमदार नाईक यांनी या मासेमारीवर कडक कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मच्छिमारांना दिले. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत एलईडी मासेमारी प्रश्नाकडे पालकमंत्री केसरकर व आमदार नाईक यांनी अनुपकुमार यांचे लक्ष वेधले.

बोटी पकडण्यासाठी हायस्पीड नौका देणार !

जिल्ह्याच्या सागरी हद्दीबरोबरच १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर मासेमारी करणाऱ्या एलईडी मासेमारीवर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने कडक कायदा करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. त्याचबरोबर कारवाईदरम्यान पकडलेल्या बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी कायद्यात बदल करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी सचिव अनुपकुमार यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी लवकरच हायस्पीड गस्तीनौका दिली जाईल असे स्पष्ट केले, अशी माहितीही नाईक यांनी दिली.

Web Title: Enactment of stringent law for illegal operation of the LED fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.