अतिक्रमण हटविले

By admin | Published: December 11, 2014 11:08 PM2014-12-11T23:08:02+5:302014-12-11T23:43:58+5:30

पालिकेची कारवाई : सावंतवाडी शहरातील घटना

Encroachment deleted | अतिक्रमण हटविले

अतिक्रमण हटविले

Next

सावंतवाडी : शहरातील रामेश्वर प्लाझासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत गाळेधारकांनी अतिक्रमण केल्याच्या वाढत्या तक्र्रारीनंतर नगरपालिकेने गुरूवारी हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले. यावेळी काही गाळेधारकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत आमच्यावरील अन्याय दूर करा, अशी मागणी केली. मात्र, नगरपालिका अतिक्रमण हटविण्याच्या पवित्र्यावर ठाम राहिली.
पालिकेचे एक पथक गुरूवारी दुपारच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात रामेश्वर प्लाझा परिसरात दाखल झाले. गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीप्रमाणे हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे आदेश दिले. मात्र गाळेधारकांनी हे अतिक्रमण हटविले नव्हते. त्यामुळे पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. यावेळी अनेक गाळेधारकांची पालिका कर्मचाऱ्यांशी तू तू मै मै झाली. मात्र, पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केल्याने कोणीही त्याला जास्त विरोध केला नाही.
मात्र, याच पार्कींग भागात असलेल्या जनरेटर वरून मात्र, थोडासा वादंग झाला. जनरेटर काढण्याच्या तयारीत असताना राजू मसूरकर यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र, पालिकेने यापूर्वी जनरेटरधारकास नोटीस न दिल्याने आजची कारवाई तात्पुरती स्थगित ठेवली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप दिवटे, सुनिल पवार, वाहतूक पोलीस किरण कांबळी, सहदेव मठकर आदींबरोबरच पालिका कर्मचारी आसावरी शिरोडकर, नागेश बिद्रे, बाबू पिंगुळकर, प्रदीप सावरवाडकर, सुनिल परब आदींनी या कारवाईत सहभाग नोंदवला
होता. (प्रतिनिधी)


कारवाई योग्यच
पालिकेच्या आक्रमक भूमिकेनंतर गाळेधारकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. या भेटीत आपल्यावरील अन्याय तत्काळ थांबवा, अशी मागणी या गाळेधारकांनी केली. तसेच महोत्सवाला सहकार्य करणार नसल्याचा पवित्रा घेतला. मात्र, या दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष साळगावकर यांनी आमची कारवाई योग्य असून नियमाप्रमाणे कारवाई आहे. आमच्यावर दबाव आणू नका, असे साळगावकर यांनी स्पष्ट केल्यानंतर गाळेधारक आल्या पावली निघून गेले.

Web Title: Encroachment deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.