कणकवलीतील अतिक्रमण पुन्हा हटविले!; विक्रेते, व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीच्या पथकाशी घातली हुज्जत 

By सुधीर राणे | Published: June 20, 2023 06:05 PM2023-06-20T18:05:45+5:302023-06-20T18:06:04+5:30

काल, सोमवारच्या कारवाई नंतरही काही विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने रस्त्यावर थाटली होती

Encroachment in Kankavli removed again; Sellers and traders laid a stand against the Nagar Panchayat team | कणकवलीतील अतिक्रमण पुन्हा हटविले!; विक्रेते, व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीच्या पथकाशी घातली हुज्जत 

कणकवलीतील अतिक्रमण पुन्हा हटविले!; विक्रेते, व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीच्या पथकाशी घातली हुज्जत 

googlenewsNext

कणकवली: शहरातील बाजारपेठ रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी कणकवली नगरपंचायतच्या पथकाने अचानक  कारवाई केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत अप्पासाहेब पटवर्धन चौक ते झेंडा चौकापर्यंत रस्त्यावर लावलेल्या दुकानांना हटवण्यात आले होते. तर सर्व्हिस रस्त्यावरीलही काही दुकानांना हटवत कारवाई करण्यात आली होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही पुन्हा कारवाई करण्यात आली.

काल, सोमवारच्या कारवाई नंतरही काही विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने रस्त्यावर थाटली होती. त्यामुळे मंगळवारी पुन्हा नगरपंचायतकडून कारवाई करण्यात आली. यावेळी काहींचा माल जप्त करण्यात आला. रस्त्यावर दुकाने मांडत असल्याने कणकवली बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. मात्र, याबाबत विक्रेत्यांकडून सूचना देऊन देखील कोणतीही नियमाचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या सुचने नुसार पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. 

या कारवाईत नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी रवी म्हाडेश्वर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. काही विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी नगरपंचायतच्या पथकाशी हुज्जत देखील घातली. तर नगरपंचायतकडून  किरकोळ विक्रेत्यांसाठी एक मोठ्या विक्रेत्यांना एक नियम लावला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. 

Web Title: Encroachment in Kankavli removed again; Sellers and traders laid a stand against the Nagar Panchayat team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.