Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 19, 2024 01:30 PM2024-10-19T13:30:37+5:302024-10-19T13:31:32+5:30

तारकर्ली येथे मत्स्यविभागाची कारवाई

Encroachment into the Sea Jaldhi area of ​​Maharashtra State High speed trawler from Karnataka Malpi seized | Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात 

Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात 

मालवण : सागरी किनारपट्टीवरील मालवण तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला आहे.

पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलर मध्ये मोठया प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेटी येथे आणण्यात आला आहे.

मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आज, शनिवारी (दि १९) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक/ रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलिस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक IND-KA-०२-MM-५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मच्छिमार संतप्त

मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्यावेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तरी अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भुमिका मांडली आहे.

Web Title: Encroachment into the Sea Jaldhi area of ​​Maharashtra State High speed trawler from Karnataka Malpi seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.