कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:41 AM2019-04-23T10:41:34+5:302019-04-23T10:43:41+5:30

कणकवली शहरातील लक्ष्मी चित्रमंदिरसमोरील मसुरकर किनई रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई  सुरू केली. मात्र, तेथील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांनी या कारवाईला विरोध केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर त्याबाबत आधी लेखी नोटीस द्या किंवा सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा, आम्ही स्वत:हून बांधकाम काढतो, असे त्यांचे म्हणणे होते.

Encroachment in Kankavali was deleted by Nagar Panchayat, controversy during action | कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग

कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग

Next
ठळक मुद्देमसुरकर किनई येथील बांधकाम : अतिक्रमण नगरपंचायतीने हटविलेकारवाईदरम्यान गाळेधारक, मुख्याधिकाऱ्यांमध्ये वादंग

कणकवली : कणकवली शहरातील लक्ष्मी चित्रमंदिरसमोरील मसुरकर किनई रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई  सुरू केली. मात्र, तेथील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांनी या कारवाईला विरोध केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर त्याबाबत आधी लेखी नोटीस द्या किंवा सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा, आम्ही स्वत:हून बांधकाम काढतो, असे त्यांचे म्हणणे होते.

तर येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत आम्ही गेला दीड महिना तुम्हांला विनंती करीत आहोत. मात्र, तुम्ही अतिक्रमण हटविले नाही, त्यामुळे आता नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. येथील अतिक्रमण आम्ही काढणारच, असा पवित्रा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकीर्डे यांनी घेतला होता.

कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि कणकवली शहरातील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांच्यात अतिक्रमण हटविण्याबाबत वादंग सुरू असताना तेथे डॉ. शमिता बिरमोळे आणि डॉ. संदीप नाटेकर आले. त्यांनीही येथील बांधकाम हटविण्यात येत असल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.

शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती हटविण्याची कारवाई होत नाही. मात्र येथे तातडीने बांधकाम हटविले जाते असा वेगवेगळा न्याय का? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी विचारला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी मला शासनाने जे काम नेमून दिले आहे ते मी करणारच अशी भूमिका मांडली.

सुमारे दोन तास येथील बांधकाम हटविण्यावरून मुख्याधिकारी आणि उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, कोणताच तोडगा निघत नव्हता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मागविला. तसेच विनाकारण वाद घालत बसलात तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर गाळेधारक आणि उपस्थितांनी नमते घेतले तर नगरपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढे सुरू करण्यात आली.

या कारवाईच्यावेळी नगरपंचायतीचे भाई साटम, विश्वनाथ शिंदे, विभव करंबेळकर, बांधकाम अभियंता सागर कुंभार, मनोज धुमाळे, सचिन नेरकर, पोलीस हवालदार दयानंद चव्हाण, विनिता भुजे आदी उपस्थित होते.

सर्वांना सारखेच नियम लावा

कणकवली शहरात महामार्गावर अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. नगरपंचायत ती तोडत नाही. मग इथेच कारवाईचा बडगा का उचलता? नियम लावायचेच असतील तर सर्वांना सारखेच लावा, असे डॉ. शमिता बिरमोळे व डॉ. संदीप नाटेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना यावेळी सुनावले.

Web Title: Encroachment in Kankavali was deleted by Nagar Panchayat, controversy during action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.