फेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 03:42 PM2021-02-15T15:42:38+5:302021-02-15T15:45:16+5:30

Devgad home sindhudurg- देवगड-जामसंडे नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सर्व्हे क्रमांक ९०/१ए मधील १.६० हेक्टर जागेत सामान्यांना परवडणाऱ्या २४० घरांचा बहुमजली गृहप्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यास सर्व आधुनिक सोयी-सुविधायुक्त ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असलेला १ बी.एच.के. सदनिका (ज्यामध्ये एक बैठक खोली, एक झोपण्याची खोली, स्वयंपाकघर, स्वतंत्र स्नानगृह व शौचालय असेल) देण्यात येणार आहे.

By the end of February, 240 beneficiaries will be decided by lottery | फेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी

फेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी

Next
ठळक मुद्देफेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी देवगड-जामसंडे नगरपंचायत : प्रधानमंत्री आवास योजना

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सर्व्हे क्रमांक ९०/१ए मधील १.६० हेक्टर जागेत सामान्यांना परवडणाऱ्या २४० घरांचा बहुमजली गृहप्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यास सर्व आधुनिक सोयी-सुविधायुक्त ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असलेला १ बी.एच.के. सदनिका (ज्यामध्ये एक बैठक खोली, एक झोपण्याची खोली, स्वयंपाकघर, स्वतंत्र स्नानगृह व शौचालय असेल) देण्यात येणार आहे.

या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जे नागरिक यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून, १९ फेब्रुवारी अखेरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. तसेच यापूर्वी ज्या नागरिकांनी सर्वांसाठी घरे अंतर्गत अर्ज केले आहेत, त्यांनादेखील याच कालावधीत ५००० रुपये भरून लॉटरीमध्ये आपला सहभाग निश्चित करावयाचा आहे, असे आवाहन देवगड जामसंडे नगर पंचायतीच्यावतीने केले आहे. सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कोणताही नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता दक्षता घ्यावी, असेही नमूद केले आहे.

या योजनेअंतर्गत वर नमूद सदनिकेची किंमत ९,०६,९७० रुपये (फक्त १ टक्का जीएसटी १००० रुपये स्टॅम्प ड्युटीसह) असून, या घराच्या खरेदीसाठी पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत एकूण रुपये २,५०,००० चे अनुदान प्राप्त होणार आहे. लाभार्थ्याला हे अनुदान वगळता उर्वरित रक्कम ६,५५,९७० रुपये त्याच्या कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार पात्र होणारे बँकेचे कर्ज व लाभार्थ्याने केलेल्या बचतीतून भरावी लागणार आहे.

ही सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त होणार असल्याने या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पन्न मर्यादेनुसार सुलभ हप्त्याने बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रती गृहसंकुल सदनिका क्रमांक निश्चित करण्यासाठी लॉटरी काढण्यात येईल.

अर्जदारास घर प्राप्त न झाल्यास रक्कम परत

देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या गृहप्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी नगरपंचायत हद्दीतीतील नागरिकांनी सोडतीमध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. आपले हक्काचे घरकुल निर्माण करण्यासाठी ५००० रुपये भरून आपल्या नावाची नोंद करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त अर्जधारकांच्या यादीमधून लॉटरीद्वारे २४० लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. ज्या अर्जदारास सोडतीमध्ये घर प्राप्त होणार नाही, अशा अर्जदारास त्याची भरलेली रक्कम सोडतीनंतर पंधरा दिवसांत परत करण्यात येईल.

Web Title: By the end of February, 240 beneficiaries will be decided by lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.