इंजिनातील बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात अडकले; नौदलानं घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:01 PM2020-04-11T15:01:26+5:302020-04-11T15:01:54+5:30

जहाज गोवा बंदरात नेण्यासाठी जहाजावरील कॅप्टनने मागितलेल्या परवानगीबाबत कोरोनामुळे गोवा सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Engine failure ship in sindhurdurga sea; The Navy took action | इंजिनातील बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात अडकले; नौदलानं घेतली दखल

इंजिनातील बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात अडकले; नौदलानं घेतली दखल

googlenewsNext

मालवण : दुबई येथून श्रीलंकेला जाणाऱ्या जहाजाच्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सध्या सिंधुदुर्गच्या खोल समुद्रात बंद स्थितीत उभे असून, ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात दिसणारे हे जहाज किनारपट्टीवर चर्चेचा विषय ठरले आहे. या जहाजाच्या दुरुस्तीसाठी जहाज गोवा बंदरात नेण्यासाठी जहाजावरील कॅप्टनने मागितलेल्या परवानगीबाबत कोरोनामुळे गोवा सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

ऑगस्ट २०१९मध्ये दुबई शारजाह येथून श्रीलंकेतील वेस्ट कोस्ट शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे क्वारा स्टार या नावाचे ऑईलचे वाहतूक करणारे जहाज श्रीलंकेला निघाले. या जहाजावर १३ कामगार असून, त्यात बहुतांश भारतीय कामगारांचा समावेश आहे. सहा सिलिंडर असणाऱ्या जहाजाचा एक सिलिंडर खराब झाला आहे. त्यामुळे हे जहाज निवती सिंधुदुर्ग यांच्यामधील ६ ते ७ नॉटिकल मैल खोल समुद्रात उभे करण्यात आले आहे. या जहाजाच्या दुरुस्तीसाठी आणि अन्नधान्याचा साठा संपत आल्याने या जहाजाच्या कॅप्टनने गोवा सरकारच्या बंदर विभागाकडे गोवा बंदरात जहाज आणण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जहाजाबाबत अद्याप गोवा सरकारने त्यांच्या मागणीचा विचार केला नसल्याचे समजते. सिंधुदुर्गच्या खोल समुद्रात बंद स्थितीत उभ्या असलेल्या या जहाजाची दखल नौदलानेही घेतल्याचे समजते.

Web Title: Engine failure ship in sindhurdurga sea; The Navy took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.