प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:02 PM2020-09-04T15:02:48+5:302020-09-04T15:04:38+5:30

मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Every fisherman will get the benefit of the package, testified Fisheries Minister Aslam Sheikh | प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाही

मच्छिमारांना जाहीर झालेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यमंत्री अस्लम शेख यांचे लक्ष वेधले.

Next
ठळक मुद्दे प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाहीवैभव नाईक यांनी घेतली मंत्रालयात भेट

मालवण : मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

दरम्यान, सिंधुदुर्गात या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर शेख यांनी सिंधुदुर्गातील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार असल्याची ग्वाही देत तशी कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ऐन मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महाचक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्गमधील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने याची दखल घेऊन मच्छीमारांसाठी ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल आम. नाईक यांनी शेख यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

प्रधानमंत्री मत्स्य संपदासाठी बैठक घ्या

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योग्य अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणे आवश्यक असून ही बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार नाईक यांनी शेख यांच्याकडे केली. त्याबाबतही शेख यांनी नियोजनासाठी बैठक आयोजित करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा फायदा देखील महाराष्ट्रात जास्तीत जास्त करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
 

Web Title: Every fisherman will get the benefit of the package, testified Fisheries Minister Aslam Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.