आंबोलीत मिळाला पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा; शेतकऱ्यांच्या गाईचा पाडला पडशा, कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 10:27 PM2021-04-29T22:27:55+5:302021-04-29T22:28:47+5:30
परिसरात भीतीचे वातावरण, हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे
सावंतवाडी: आंबोली हिरण्यकेशी परिसरात पट्टेरी वाघ असल्याचा पुरावा वनखात्याला मिळाला असून वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा पट्टेरी वाघ कैद झाला आहे.
सह्याद्री पट्ट्यात कोयना राधानगरी चांदोली अभयारण्यात जंगल भागात तसेच तिलारी जंगल भागात हा पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सदर पट्टेरी वाघाचे दर्शन वनखात्याने जंगल भागात लावलेल्या कॅमेरा टिपले गेले आहे सदर पट्टेरी वाघ आंबोली हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वीच आंबोली येथील एका शेतकऱ्यांच्या गाईचा पडशा पाडला होता. या पट्टेरी वाघाने पडला होता.
यावेळी ग्रामस्थांनी पट्टेरी वाघाचे वास्तव्य असल्याचा दावाही केला होता परंतु यावेळी ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे वनविभागाकडून कानाडोळा करण्यात आला होता.परंतु हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे त्यामुळे आंबोलीत पट्टेरी वाघ वास्तव्यास असल्याचे सिद्ध झाले आहे. सह्याद्री पट्ट्यात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात जे कोल्हापूर सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात गेल्या काही वर्षापासून पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सह्याद्रीचा पट्टा हा पट्टेरी वाघा चे राज्य झाले आहे सध्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रात एक मेळाव पट्टेरी वाघ सर्वत्र फेरफटका मारत असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले असून मागील काही वर्षापूर्वी आंबोली त पाटगाव च्या जंगलात ब्लॅक पॅथर ही आढळून आला होता.त्यानंतर पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने वनविभागाची जबाबदारी आणखी वाढली आहे.पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या जंगलात पाच वाघाचे अस्तित्व आढळून आले होते.मात्र नंतर ही संख्या शून्य वर आली होती.