हकालपट्टीच्या चाहुलीने चोरगेंची वेगळी वाट

By admin | Published: January 24, 2017 11:43 PM2017-01-24T23:43:30+5:302017-01-24T23:43:30+5:30

भालचंद्र साठे : स्नेहलता चोरगेंच्या आरोपांचे खंडन; ‘नजरकैदे’ची तक्रार का केली नाही?

Exclamation of the thief is a different way of thieving | हकालपट्टीच्या चाहुलीने चोरगेंची वेगळी वाट

हकालपट्टीच्या चाहुलीने चोरगेंची वेगळी वाट

Next



वैभववाडी : स्नेहलता चोरगे निवडून आल्यापासून त्यांचे पक्षातील वागणे संशयास्पद आणि अविश्वासाचे होते. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी निश्चित झाली होती. त्यामुळे हकालपट्टीची चाहूल लागताच चोरगे यांनी वेगळी वाट धरली, असे स्पष्ट करीत कथित ‘नजरकैदे’ची त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे दीड वर्षात तक्रार का केली नाही? असा प्रश्न काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
वैभववाडी येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, वैशाली रावराणे, महिला अध्यक्षा प्राची तावडे, भारती रावराणे, रितेश सुतार, अशोक रावराणे आदी उपस्थित होते.
साठे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान मिळत नाही हा चोरगेंचा आरोप खोटा आहे. कारण माई सरवणकर यांच्यासारख्या सक्षम उमेदवार पक्षाकडे असतानासुद्धा नारायण राणे यांनी स्नेहलता चोरगेंना दुसऱ्या पक्षातून आयात करुन निवडून आणले. सभापतीपद दिले यापेक्षा ‘आयात’ केलेल्यांना आणखी सन्मान काय द्यायला हवा? मुळात चोरगे यांची राजकीय वाटचाल पाहता तिथे त्यांना काय सन्मान मिळत होता? असे प्रश्न उपस्थित करून विविध राजकीय पक्षांशी असलेले त्यांचे हीतसंबंध सर्वांना ज्ञात आहेत. एकीकडे नारायण राणे यांचा आदर असल्याचे सांगतात, आणि आमदार नीतेश राणेंवर टीकाही केली. यातले नेमके खरे काय? चोरगे पदाधिकारी होत्या, मात्र, त्यांनी पक्ष कार्यकर्त्याची भूमिका कधीही बजावली नाही. कार्यकर्त्यांमध्ये चुकीची माहिती पसरवून पक्ष आणि नेतृत्वाविषयी नेहमी दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना फोन करुन गैरसमज पसरविण्याचा उद्योग चोरगे यांनी सुरुच ठेवला आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न साध्य न झाल्यामुळे चोरगे पक्ष आणि आमदार राणे यांना बदनाम करण्यासाठी ‘नजरकैदे’चा आरोप करीत आहेत, असेही साठे म्हणाले. (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा
काँग्रेस पक्षात माणसे जमवून ती जपली जातात. आम्ही पक्षात पैसे कमावण्यासाठी आलेलो नाही. चोरगे यांना निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांनी पैसे घेऊन प्रचार केला, असा आरोप करून त्यांनी कृतघ्नपणा दाखवून दिला आहे. त्यामुळे चोरगे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा द्यावा, असे आव्हान देत कोकिसरे जिल्हा परिषद सदस्याचा विकासनिधी मतदारसंघात नसलेल्या एडगाव आणि मालवण तालुक्यात गेला कसा? ऊसाच्या शेतातील रस्ता आणि सौरदीप आले कशातून? याचेही स्पष्टीकरण जनतेला द्यावे, असे साठे यांनी सांगितल

‘नजरकैदे’चा आरोप खोटा : शुभांगी पवार
वैभववाडी नगरपंचायतीचा प्रचार संपल्यावर आम्ही सर्व महिला पदाधिकारी आमदार नीतेश राणे यांचे वास्तव्य होते तिथे गेलो होतो. तेव्हा ते बंगल्यावर नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व महिला पदाधिकारी आमदारांची वाट पाहत तिथेच थांबलो होतो. ते आल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन चोरगेंसह आम्ही तिथून एकत्रच निघालो होतो. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी ‘नजरकैदे’त ठेवल्याचा स्नेहलता चोरगे यांनी केलेला आरोप खोटा आहे, असे सभापती शुभांगी पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या विधानाला वैशाली रावराणे यांनी पुष्टी दिली.े.

Web Title: Exclamation of the thief is a different way of thieving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.