विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर : मोंडकर

By admin | Published: July 16, 2016 10:57 PM2016-07-16T22:57:42+5:302016-07-16T23:32:39+5:30

मालवणात गौप्यस्फोट : काँग्रेसमुक्त पालिका करण्याचा भाजपचा नारा

Existing corporator on BJP's path: Mondak | विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर : मोंडकर

विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर : मोंडकर

Next

मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसमुक्त पालिका हाच भाजपचा नारा असणार आहे. शहरात सत्ता बदलासाठीच भाजपा प्रयत्नशील असून पालिकेतील अनेक विद्यमान नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. काही नगरसेवकांचा लवकरच प्रवेशही होणार आहे, असा गौप्यस्फोट भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केला आहे.
भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष बबलू राऊत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर सरचिटणीस संदीप शिरोडकर आदी भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मोंडकर म्हणाले, मालवण शहरात असलेल्या १४ हजार मतदारांपैकी २० टक्के मते ही वेगळ्या प्रभागात काही स्थलांतरित अशा स्वरुपात आहेत. या मतांचा वापर करून काही नगरसेवक अनेक वर्षे आपली पोळी भाजत आहेत. मात्र नगरसेवकांचा हा डाव भाजपा यावेळी उधळून लावणार आहे. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत नमुना सात या अर्जानुसार संदीप शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरु आहे. ४१६ ही हरकती नोंद झाल्या आहेत. हरकत नोंदवलेल्या कोणाचेही मतदार यादीतून नाव कमी होणार नाही. ३१ आॅगस्टपर्यंत या हरकती घेतल्या जाणार आहेत. तालुक्यातही मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून भाजपच्या प्रत्येक जिल्हा परिषद प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्वला गॅस कनेक्शन ही नवी योजना दारिद्र्यरेषेखालील जनतेसाठी जाहिर करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील ९ हजार ४८२ कुटुंबांची यादी मंजूर करण्यात आली आहे. या कुटुंबाचे गॅस कनेक्शन नसल्यास कुटुंबातील महिला प्रमुखाच्या नावावर गॅस कार्ड मिळणार आहे. यासाठी १६०० रुपये शासन अनुदान तर १६५० रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहे. मंजूर झालेली लाभार्थ्यांनी यादी गॅस केंद्र तसेच भाजपा कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती मोंडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Existing corporator on BJP's path: Mondak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.