सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:27 PM2021-06-12T18:27:52+5:302021-06-12T18:29:26+5:30
CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.
शासनाकडील १० जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजनबेडस व्यापल्याची टक्केवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा ११.८९ टक्के असून, ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी ५१.५९ टक्के इतका आहे.
सद्यस्थितीत देखील सिंधुदुर्ग जिल्हा स्तर-4 मध्ये असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागू करण्यात आलेल्या आदेशास १४ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.