प्रदूषण रोखण्यासाठी अतिरिक्त झाडे लावणार

By admin | Published: February 13, 2015 10:15 PM2015-02-13T22:15:55+5:302015-02-13T22:54:25+5:30

जनसुनावणीत सुचविले उपाय : पावसाचे पाणी अडवून पुन्हा वापरणार--लोकमत विशेष

Extra trees to prevent pollution | प्रदूषण रोखण्यासाठी अतिरिक्त झाडे लावणार

प्रदूषण रोखण्यासाठी अतिरिक्त झाडे लावणार

Next

नीलेश मोरजकर - बांदा मोपा विमानतळ प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जनसुनावणीत पर्यावरणविषयक चर्चा झाली. त्यात प्रदूषण रोखण्यासाठी हरितपट्टा तयार करणे, पावसाचे पाणी अडवून त्याचा पुनर्वापर करणे, तसेच सांडपाण्यावर उपाययोजना करणे आणि परिसरात अतिरिक्त झाडे लावणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.मोपा येथील पठारावर १ फेबु्रवारी रोजी जनसुनावणी घेण्यात आली. त्यात ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीने पर्यावरणविषयक अहवाल सादर केला. विमानतळ प्रकल्प परिसरात ३८५ प्रकारच्या उपयोगी वनस्पती व ८५ जातीच्या विविध पक्ष्यांच्या जाती या परिसरात आहेत. या परिसराची ७,२९८ लोकसंख्या असून १,६४0 कुटुंबे विमानतळ परिसरात आहेत. येथील हवा प्रदूषण, धूर नियंत्रण यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर उपाययोजना करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी ज्या झाडांची तोड करण्यात येणार आहे, त्याच्या बदल्यात विमानतळ परिसरात अतिरिक्त झाडे लावण्यात येणार आहेत.


मोपा विमानतळ घटनाक्रम
मार्च २००० - मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. (तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकार).
२००२ - भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ. प्रकल्पासाठी २१०० एकर जमिनीची आवश्यकता. सुरुवातीला ८० टक्के म्हणजेच १८६० एकर जमीन संपादित करण्यात आली. अन्यायकारक जमीन संपादनाविरोधात शेतकरी न्यायालयात.
२००५ - आयकाव (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आॅर्गनायझेशन) चा पहिला अहवाल सादर.
२००७ - आयकावचा दुसरा अहवाल सादर.
२००७ - मोपा विमानतळ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दक्षिण गोव्यातील वजनदार नेते चर्चिल आलेमाव यांच्याकडून ‘सेव्ह गोवा पार्टी’ची स्थापना. त्यानंतर झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत दोन आमदारांची निवड.
२००९ - विमानतळ प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या ‘मेसर्स अमान अ‍ॅण्ड व्हायटनी’ कंपनीने तयार केला मास्टर प्लॅन.
२०१० - केंद्र सरकारकडून मोपा हरित आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी.
आॅक्टोबर २०१४ - गोवा राज्य मंत्रिमंडळाकडून मोपा ‘आरएफक्यू’ (रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन) मसुद्याला मंजुरी. शासनाच्या आरएफक्यूला १५ खासगी कंपन्यांकडून प्र्रतिसाद.
नोव्हेंबर २०१४ - मोपासाठी आरएफक्यू निविदा जारी. ‘गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली’ कडून मोपाला विरोध. या प्रकल्पाविरोधात जाहीर सभा.
१ फेबु्रवारी २०१५ - मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोपा येथील पठारावर प्रकल्पबाधित गावांमधील जनतेसाठी गोवा शासनाकडून जाहीर जनसुनावणी.
या जनसुनावणीत मोपा विमानतळ प्रकल्पाला ९0 टक्के समर्थन. विरोधकांना बोलण्यास मज्जाव. स्थानिकांना प्रकल्पात सामावून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.


हरितपट्टा तयार करणार
हवा व जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी हरितपट्टा तयार करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी अडवून प्रक्रिया करुन ते वापरण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी आपत्कालीन योजना राबविण्यात येणार आहे.

Web Title: Extra trees to prevent pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.