संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:33 PM2021-06-01T16:33:37+5:302021-06-01T16:36:21+5:30

Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.

Eyes watered as the world collapsed! | संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

Next
ठळक मुद्देसंसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले ! कणकवली तालुक्यात तौक्ते वादळाने मोठे नुकसान

सुधीर राणे

कणकवली : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.

तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वानाच हैराण करून सोडले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. सह्याद्री पट्ट्यातील गावांमधिल अनेक घरांची छपरे पत्याप्रमाणे उडून गेली. नारळ, आंबा, काजू यांची झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. हापूस आंब्याचेही नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या चक्रीवादळात फळ बागांचे नुकसान झाल्याने हिरावून घेतला गेला आहे.
घरांच्या छपरांची कौले, सिमेंटचे व लोखंडी पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठयांचीही हानी झाली आहे. विजेच्या खांबांवर झाडे तुटून पडल्याने अनेक खांब मोडून पडले होते. तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता. अकरा दिवसांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणला वीज प्रवाह सुरळीत करण्यात यश आले आहे.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान झालेल्याना भरघोस भरपाई देण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी लावून धरली आहे. ग्रामसेवक, तलाठी , कोतवाल, पोलीस पाटील , मंडळ अधिकारी आदी महसुलचे कर्मचारी यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून पंचयादी घातली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.

खासदार, आमदार, पालकमंत्री व अन्य नेत्यांनी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मात्र, शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार ? याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकसान भरपाईची ते अगदी चातका प्रमाणे वाट बघत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

घरांची डागडुजी करण्यासाठी अनेकाना आर्थिक मदतीची गरज असून आता कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे काही नुकसानग्रस्तांनी सांगितले. सरकारची मदत मिळेपर्यंत आमचे घर नादुरुस्त स्थितीत ठेवू शकत नाही. पावसाळा जवळ आल्याने त्याची त्वरित डागडुजी करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले.

निसर्गाच्या या दणक्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. कणकवली तालुक्‍यातील नुकसानीचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहचला आहे. मात्र, सरकारकडून नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्या सोबत जमिनीचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.त्यामुळे ते चिंतीत आहेत. तालुक्यातील साकेडी, कलमठ, भिरवंडे,नाटळ, नरडवे,वाघेरी,फोंडाघाट आदी परिसरात झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तराळत आहेत.

Web Title: Eyes watered as the world collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.