कागदी लगद्यापासून बनविल्या आकर्षक वस्तू

By Admin | Published: January 22, 2017 11:43 PM2017-01-22T23:43:44+5:302017-01-22T23:43:44+5:30

कणकवली विद्यामंदिरच्या चित्रकलेला वाव : महाराष्ट्र शासन हस्तकला विभाग मुंबईच्यावतीने आयोजन

Fabulous objects made from pulse pulp | कागदी लगद्यापासून बनविल्या आकर्षक वस्तू

कागदी लगद्यापासून बनविल्या आकर्षक वस्तू

googlenewsNext



प्रदीप भोवड ल्ल कणकवली
महाराष्ट्र शासन हस्तकला विभाग मुंबई कार्यालयाच्यावतीने आयोजित कागदी लगद्यापासून बनवलेल्या आकर्षक वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशमूर्ती व फळफळावळही सर्वांगसुंदर आहेत. सिंधुदुर्गातील सुमारे ३0 प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या या वस्तूंना बाजारात चांगली मागणी मिळेल अशी आशा या प्रशिक्षण वर्गाचे व्यवस्थापक, विद्यामंदिर प्रशाला कणकवलीचे कलाशिक्षक प्रसाद राणे व प्रशिक्षक अविनाश पाटकर यांनी व्यक्त केली आहे.
कागदी लगद्यापासून वस्तू बनविण्याचे १६ दिवसांचे प्रशिक्षण येथील विद्यामंदिर प्रशालेत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत खोत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण वर्गात ३0 जण सहभागी झाले होते. प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, गणेशमूर्ती, फळफळावळ पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विद्यामंदिर प्रशालेत आयोजित प्रदर्शनाचा लाभ सुमारे २00 जणांनी घेतला. असे प्रशिक्षण आयोजित करून सुशिक्षित महिलांच्या हातालाही काम द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षणामध्ये १८ वर्षांपासून ७२ वयोमानाचे गृहस्थही सहभागी झाले होते. हे प्रशिक्षण शासनमान्य असून या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिले जाते. शिवाय शासनाच्या विविध योजनांमध्ये या प्रशिक्षणाचा लाभ मिळतो. या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले काही विद्यार्थी, काही गृहिणी तर काही मूर्तिकारही होते, अशी माहिती प्रसाद राणे यांनी दिली. आपल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य कलाकारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कणकवलीत करण्यात आल्याचे प्रसाद राणे यांनी सांगितले.
हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत होते. या प्रशिक्षणार्थींना आर्टिझन कार्ड व आम आदमी विमा योजना पॉलिसी विना शुल्क काढून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी खास मुंबईहून आलेले अविनाश पाटकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये प्लॅस्टरचा साचा व रबरचा साचा तयार कसा करावा या गोष्टीही शिकविण्यात आल्या. या प्रशिक्षणामधून सर्व प्रशिक्षणार्थींना उत्पन्नाचा व व्यवसायाचा एक नवा मार्ग मिळाला आहे.
सर्व प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळया आकाराच्या सुमारे ४00 आकर्षक वस्तू बनविल्या. या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या हस्ते झाले होते. विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत खोत व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.

Web Title: Fabulous objects made from pulse pulp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.