ग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 05:28 PM2021-04-21T17:28:36+5:302021-04-21T17:34:19+5:30

Mango Sindhudurg : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिंकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

Facilitate customers to buy Hapus Mango online | ग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा

ग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा

Next
ठळक मुद्देग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा थेट शेतकऱ्यांकडे मागणी : आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू

वेंगुर्ला : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिंकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंबा महोत्सवाचे आयोजन करणे अद्याप शक्य झालेले नाही.

कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये याकरिता उत्पादक व ग्राहक या दोघांनाही ऑनलाइन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com  या संकेतस्थळावरील buyer seller information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com   या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाने सदर पोर्टलवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू केली आहे.

त्यामध्ये आंबा उत्पादकांचे नाव, संपर्क क्रमांक, आंबा उपलब्ध तपशील आदी माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे पुणे, मुंबई तसेच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी पोर्टलवर नोंदविता येईल किवा विशिष्ट आंबा उत्पादकांशी संपर्क करता येऊ शकेल व आंबा खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करून शहरातील ग्राहकांना त्यांच्या घरी आंबा पोहोच करू शकतील. आंबा खरेदीकरिता किमान मर्यादा १०० डझन असणार आहे.

ग्राहकांची कृषी पणन मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी

कृषी पणन मंडळाकडून कोकणातील दर्जेदार व नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हावा यासाठी आंबा उत्पादकांनी पोर्टलवर विक्रेता म्हणून व ग्राहकांची कृषी पणन मंडळाचे पोर्टलवर खरेदी म्हणून नोंदणी करावी. तसेच उपलब्ध आंबा अथवा आंब्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Facilitate customers to buy Hapus Mango online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.