सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

By अनंत खं.जाधव | Published: July 8, 2024 05:22 PM2024-07-08T17:22:37+5:302024-07-08T17:22:56+5:30

दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळली

Falls due to heavy rains in Sawantwadi; Emergency system on alert, Panchnama begins | सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

सावंतवाडी : तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पडझडीचे सत्र सुरूच असून आपत्कालीन यंत्रणाही आता सतर्क झाली आहे. नुकसानीचे पंचनामे आता तातडीने केले जात आहेत. दरम्यान, काल, रविवार सकाळपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.

तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसानीचे सत्र सुरू आहे. याचबरोबर रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा सुटल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. माडखोल येथे नदीची पाणी पातळी वाढली आहे. तळवडे होडावडे पुलावर वरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पाणी पुलावरून ओसरले आहे. तर तळवणे माऊली टेम येथे सुनील पुरुषोत्तम परांजपे व कृष्णा भिकू रेडकर यांच्या पडवीत पाणी गेले होते. यासह निरवडे कोंडुरा मळेवाड सोनुर्ली वेत्ये मळगाव माझगाव आदी गावातील छोटी मोठी पुले पाण्याखाली गेली होती.

तर शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली होती. बावळाट येथे गोपाळ यशवंत परब यांच्या घरावर फणसाचे झाड पडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबोली येथील हनुमंत नवलू पाटील यांची म्हैस पाण्यात बुडून मृत्यू झाली आहे. नेमळे येथे पाटकर वाडी येथे ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी शहरात सलाउद्दीन गुलाब तहसीलदार यांच्या गडग्यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी सालईवाडा गुंडू केशव आईर यांच्या गाडीवर भिंत पडून नुकसान झाले आहे. 

दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळली

मुसळधार पावसाने दाणोली बांदा मार्गावरील दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली होती. अखेर बांधकाम विभागाकडून ही दरड हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title: Falls due to heavy rains in Sawantwadi; Emergency system on alert, Panchnama begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.