हत्तीकडून शेतीचे नुकसान; कर्नाटकमधील तज्ञांची मदत घेणार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:40 PM2022-12-10T12:40:53+5:302022-12-10T12:41:44+5:30

राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार

farm damage from elephants; The help of experts from Karnataka will be sought, informed the Principal Chief Conservator of Forests | हत्तीकडून शेतीचे नुकसान; कर्नाटकमधील तज्ञांची मदत घेणार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली माहिती 

हत्तीकडून शेतीचे नुकसान; कर्नाटकमधील तज्ञांची मदत घेणार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली माहिती 

Next

सावंतवाडी : सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्हयाला भेडसावणाऱ्या हत्ती प्रश्नावर आता पुन्हा एकदा वनविभाग कर्नाटक मधील हत्ती तज्ञांची मदत घेणार आहे. याबाबतची प्राथमिक चर्चा ही या तज्ञांशी झाली असल्याची माहिती नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वायएलपी राव यांनी दिली.

राव हे शुक्रवारी सिंधुदुर्गवनविभागाच्या आढावा बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम, उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, अमृत शिंदे, एस.सोनवडेकर उपस्थित होते.

राव म्हणाले, हत्तीकडून सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय योजना आखण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम यांनी अलिकडेच कर्नाटक राज्यातील हत्ती तज्ञांशी चर्चा केली आहे. ही प्राथमिक चर्चा होती. पण लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर एक अधिकाऱ्याचे पथक तिथे जाईल व हत्ती बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील असे राव यांनी स्पष्ट केले.

हत्तीसह वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे.या नुकसानीत वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाकडे एक  प्रस्ताव पाठवण्यात आला असून या प्रस्तावाच्या आधारे भविष्यात नुकसान भरपाईत मोठी वाढ होईल. सध्या हा प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर असल्याचे राव यांनी सांगितले. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही.

सध्या मी राज्याचा दौरा करून जंगल क्षेत्रात काय बदल करायचे नवीन काय सुचना आहेत का यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत आहे. त्याबाबतच चर्चा करण्यासाठी आलो होतो अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावाही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: farm damage from elephants; The help of experts from Karnataka will be sought, informed the Principal Chief Conservator of Forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.