हत्तींच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:40 PM2019-06-10T16:40:37+5:302019-06-10T16:41:00+5:30
मोर्ले येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्याचा जंगली हत्तींनी पाठलाग केल्याची घटना शनिवारी घडली. अनंत आपा देसाई (५५) असे शेतकºयाचे नाव असून, सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले आहेत.
दोडामार्ग : मोर्ले येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्याचा जंगली हत्तींनी पाठलाग केल्याची घटना शनिवारी घडली. अनंत आपा देसाई (५५) असे शेतकऱ्यांचे नाव असून, सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले आहेत.
मोर्लेमध्ये काही दिवसांपासून हत्तींचा वावर आहे. यातील टस्कर हत्ती थेट लोकवस्तीत घुसत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत.
वनविभाग मात्र तकलादू उपाययोजनांव्यतिरिक्त हत्ती पकड मोहिमेबाबत ठोस कारवाई करत नसल्याने हत्तींची दहशत वाढत चालली आहे. शनिवारी सायंकाळी मोर्ले येथील काजू बागायतदार अनंत देसाई हे आपल्या काजूच्या बागेतून घरी परतत असताना टस्कराने त्यांचा पाठलाग केला.
जीवाच्या आकांताने आपले संरक्षण करण्याकरिता देसाई यांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी आपला मार्ग बदलल्याने ते सुदैवाने बचावले.