हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील मोर्ले येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 8, 2025 11:53 IST2025-04-08T11:52:52+5:302025-04-08T11:53:32+5:30

दोडामार्ग : काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला करून त्याला ठार केले. लक्ष्मण यशवंत गवस (वय ...

Farmer killed in elephant attack incident in Morle Sindhudurg | हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील मोर्ले येथील घटना

संग्रहित छाया

दोडामार्ग : काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला करून त्याला ठार केले. लक्ष्मण यशवंत गवस (वय -६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मोर्ले येथे आज, मंगळवारी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण गवस या वृद्धावर हत्तीने हल्ला केला. गवस यांना हत्तीने सोंडेने पकडून उचलून जमिनीवर आपटून जीव घेतला. दरम्यान वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ग्रामस्थांनी मृतदेह अद्याप ताब्यात घेतलेला नाही.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. गेले दोन महिने हत्तींचा कळप याठिकाणी ठाण मांडून असून मोठ्या प्रमाणावर शेती, बागायतींचे नुकसान करीत आहे. कर्नाटक प्रमाणे हत्ती पकड मोहिम राबवून या रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी, बागायतदारांची आहे. हत्ती वेळोवेळी मनुष्यवस्ती जवळ फिरताना ही आढळून आले आहेत. मात्र अद्याप शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही. 

Web Title: Farmer killed in elephant attack incident in Morle Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.