शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 03:52 PM2020-09-30T15:52:32+5:302020-09-30T15:54:37+5:30
देवगड तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.
देवगड : तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.
दरम्यान, तालुक्यात शेतीची दोन प्रकारात नुकसानी झाली असून त्याप्रमाणे नुकसानीचा सर्व्हे करावा अशी सूचना सभापती सुनील पारकर यांनी केली. तर तत्काळ नुकसानीची पाहणी करून, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी केली.
पंचायत समिती देवगडच्या सभापती दालनामध्ये तालुक्यातील भातशेती नुकसानीबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती सुनील पारकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, प्रभारी तालुका कृषी अधिकारी उल्पे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंंजवडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शरद शिंंदे आदी उपस्थित होते.
तालुक्यात ४५०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली आहे. यावर्षी भातशेतीचे ५०० हेक्टर क्षेत्र वाढले आहे. कृषी सहाय्यकांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात भातशेती नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल घेतला असून ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे यांनी केली.