शिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 06:25 PM2021-03-29T18:25:58+5:302021-03-29T18:29:33+5:30

mahavitaran Kudal Sindhudurg- कुडाळ तालुक्यातील बाव घोडे खुटवळ येथील शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी शेतात सोडलेल्या वीज तारेचा प्रवाहाचा शॉक लागल्याने कविलकट्टा येथील दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता पुत्राचां जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.  हा वीज तारेचा प्रवाह या दोघानीच शिकारीच्या उद्देशाने सोडल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.

Father and son die on the spot due to electric shock released for hunting purposes | शिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यू

शिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देशिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यूया दोघानीच शेतात शिकारीच्या उद्देशाने वीजप्रवाह सोडल्याची माहिती

कुडाळ : तालुक्यातील बाव घोडे खुटवळ येथील शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी शेतात सोडलेल्या वीजप्रवाहाचा शॉक लागल्याने कविलकट्टा येथील दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.  हा वीजप्रवाह या दोघानीच शिकारीच्या उद्देशाने सोडल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.

 सोमवारी पहाटे 06.45 वाजण्याच्या सुमारास बाव येथील बळवंत परब हे त्यांच्या शेतातील नाचण्याची कणसे काढण्यासाठी गेले असताना त्यांना इलेक्ट्रीक तारेचा शॉक लागुन ते शेतात पडल्याचे आजुबाजुच्या लोकांनी पाहिल्यावर त्यांना कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता आणले.

बळवंत परब यांना शेतातुन उचलुन रूग्णालयात पाठविल्यानंतर शेतात वीज प्रवाह कोठुन येतो? वायर कुठ पर्यंत पडलेली आहे, हे पाहण्यासाठी बाव सरपंच नागेश परब तसेच इतर काही ग्रामस्थ पाहणी करीत असताना पुढे 200 मीटर अंतरावर बाव घोडे खुटवळ या शेतात कविलकट्टा येथे राहणारे दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता पुत्र शेतात एकाच ठिकाणी पडलेले होते. त्यांची हालचाल होत नसल्यामुळे तेथील उपस्थितांनी त्या दोघांनाही कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे आणले. तेथे त्यांना तपासले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वीजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली की, डुक्कराची शिकार करण्यासाठी या शेतावरून जाणाऱ्या वीजवाहीन्यांवर बांबुच्या सहाय्याने तारेचा हुक टाकुन हा वीज प्रवाह प्रवाहीत करण्यात आला होता. जेणेकरून तेथे आलेल्या डुक्करानां त्याचा शॉक लागुन त्याची शिकार करता यावी. डुक्कर पकडण्यासाठी तारेचा वीज प्रवाह तेथील शेतात सुमारे 200 मीटर अंतरावर पसरला होता.  या वीज प्रवाहाचा जोरदार शॉक दिपक मातोंडकर व भगवान मातोंडकर या पिता-पुत्राना लागल्याने त्यांना जीव गमवावा लागला. वीज प्रवाह शेतात दिपक व भगवान यांनी शिकार करण्यासाठी सुरू केला होता का? याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

सकाळी शेतात जाणारे बळवंत परब हे जखमी झाले असुन त्यांनाही कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने अजुनही शेतकरी शेतात येत होते मात्र या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली. घटना समजताच तत्काळ बाव सरपंच नागेश परब कुडाळ पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असुन या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत. दिपक व भगवान यांच्या मृत्युमुंळे मांतोडकर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असुन दिपक यांच्या पत्नी तर भगवान याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाचा लहान मुलगा, आई असा परिवार आहे.

Web Title: Father and son die on the spot due to electric shock released for hunting purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.