साथरोग पसरण्याची भीती

By admin | Published: June 19, 2015 12:02 AM2015-06-19T00:02:29+5:302015-06-19T00:18:31+5:30

दूषित पाणीपुरवठा : खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडीतील घटना

Fear of spread of diseases | साथरोग पसरण्याची भीती

साथरोग पसरण्याची भीती

Next

खारेपाटण : खारेपाटण ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या हसोळटेंब कोंडवाडी येथील ग्रामस्थांना सध्या पिण्याच्या दूषित पाण्याला सामोरे जावे लागत असून यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हसोळटेंब कोंडवाडी येथील नागरिकांसाठी स्वतंत्र कॉजवेल खारेपाटण शुकनदीजवळ बांधण्यात आली असून त्या कॉजवेलमधून नागरिकांना पिण्याचे पाणी दिले जाते. तिच्या तळाशी छोटा होल ठेवण्यात आला आहे. या कॉजवेलजवळून एक मोठा ओहोळ जात असून या ओहोळाचे पाणी या कॉजवेलमध्ये जाते आणि त्यामुळे आम्हाला दूषित पाणी येते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा म्हणजेच स्थानिक ग्रामपंचायत यांनी याबाबत मौन पाळलेले दिसते. सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे साथीचे आजार पसरु शकतात. अशावेळी पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असेल तर ही अशोभनीय बाब आहे. त्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष येथील ग्रामस्थ सचिन शिंदे, राजेंद्र राऊत यांनी आपल्या घरातील पाणी पिण्याची भांडी (हंडा,कळशी) व त्यातील दूषित मातीचा गाळ साचलेले पाणी प्रत्यक्ष दाखविले. हे पाणी पिण्यास अयोग्य असून यामुळे कोणतेही साथीचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही तसेच या कॉजवेलची स्वच्छता गाळ उपसणी पावसाळ्यापूर्वी झालेली नसून कॉजवेलचे दूषित पाणी पिण्यापेक्षा नदीचे स्वच्छ पाणी प्यालेले बरे अशी ग्रामस्थांनी भूमिका मांडली. ही बाब येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या अधिकाऱ्यांना बोलावून हे पाणी परीक्षणासाठी पाठविले आहेणे गरजेचे बनले
आहे. (वार्ताहर)

Web Title: Fear of spread of diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.