कणकवलीवासीय रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर, वटवृक्षाला अलविदा करताना व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:53 PM2018-11-12T13:53:31+5:302018-11-12T13:59:24+5:30

कणकवलीची शेकडो स्थित्यंतरे ज्याने पाहिली तसेच सुखद- दु:खद क्षण, नेत्यांच्या सभा ज्याने अनुभवल्या, अनेक वाटसरूना ज्याने विसावा दिला अशा हॉटेल सह्याद्री जवळील वटवृक्षाची सावली आता केवळ आठवणीतच रहाणार आहे. कारण हा वटवृक्ष आता महामार्गाच्या चौपदरीकरणात तुटणार आहे. त्यामुळे त्या वटवृक्षाच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर कणकवलीवासीय रविवारी रमले.

The feelings expressed by the people of Kankavlivali ramley memories, bypassing the tree | कणकवलीवासीय रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर, वटवृक्षाला अलविदा करताना व्यक्त केल्या भावना

कणकवलीवासीय रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर, वटवृक्षाला अलविदा करताना व्यक्त केल्या भावना

Next
ठळक मुद्देकणकवलीवासीय रमले आठवणींच्या हिंदोळ्यावरवटवृक्षाला अलविदा करताना व्यक्त केल्या भावनामहापुरुष मित्रमंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली : कणकवलीची शेकडो स्थित्यंतरे ज्याने पाहिली तसेच सुखद- दु:खद क्षण, नेत्यांच्या सभा ज्याने अनुभवल्या, अनेक वाटसरूना ज्याने विसावा दिला अशा हॉटेल सह्याद्री जवळील वटवृक्षाची सावली आता केवळ आठवणीतच रहाणार आहे. कारण हा वटवृक्ष आता महामार्गाच्या चौपदरीकरणात तुटणार आहे. त्यामुळे त्या वटवृक्षाच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर कणकवलीवासीय रविवारी रमले.

निमित्त होते ते येथील महापुरूष मित्रमंडळाच्यावतीने पशु पक्षांसह सर्वांचाच आधारवड ठरलेल्या वटवृक्षाच्या आठवणी जागविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित कणकवली वासियानी मनोगत व्यक्त करताना हा वटवृक्ष वाचविण्याबाबत विविध मते मांडली. तसेच त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचाही संकल्प केला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, नगराध्यक्ष समीर नलावडे ,नगरसेवक अभिजीत मुसळे , सुशिल पारकर,संजय मालंडकर, अप्पिशेठ गवाणकर, बाळा बांदेकर, सतीश नाडकर्णी, राजन कदम, अड़. विलास परब, नामानंद मोडक, बंडू हर्णे, गुरु पावसकर, चंद्रशेखर उपरकर, संजय सांडव, सुहास हर्णे, दिनेश केळूसकर, दिवाकर केळूसकर, उमेश वाळके, विलास खनोलकर , दादा कोरडे , चंदू भोसले, संजय राणे, हेमंत सावंत, व्ही. के सावंत, यशवंत महाडिक, आनंद पारकर , लक्ष्मीकांत मुंडले आदी उपस्थित होते.


यावेळी अनिल शेट्ये म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीतील व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत.या महामार्गात हा वटवृक्ष जाणार आहे. हे फक्त झाड़ नव्हे तर त्यामागच्या भावना उध्वस्त होणार आहेत. एका वृक्षाला जीवंतपणीच श्रध्दांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आहे.

डॉ. बाळकृष्ण गावड़े यांनी वटवृक्षाबाबत शास्त्रीय माहिती दिली. तसेच कणकवलीचे वैभव असलेल्या या वटवृक्षावर अनेक पक्षी एकोप्याने रहातात. तर त्यांच्यासारखेच माणूस एकोप्याने का राहू शकत नाही?असा प्रश्न उपस्थित केला. येथे उपस्थित व्यक्तिनी आपल्यासाठी एक तरी वटवृक्षाचे झाड़ लावावे . तीच या वटवृक्षाला खरी श्रध्दांजली ठरेल असे सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यानी विकास करताना पर्यावरण रक्षण करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तर द्शावतारी कलाकार बी.के. तांबे यांनी वटवृक्षाच्या आठवणीना उजाळा देताना त्याने अनेक पशुपक्षाना आपल्या बगलेत घेतले, पूर्वीच्या काळी गोंधळ्याचा संबळ, पांगुळ बैल वाल्याची ढोलकी येथे थांबल्याशिवाय पुढे गेली नसल्याचे सांगितले. हा वटवृक्ष खऱ्या अर्थाने आधारवड असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते भाई खोत म्हणाले, जेव्हा एखाद्या व्यक्तीला निरोप देण्याचा प्रसंग येतो त्यावेळी डोळ्यात अश्रू येतात. यावेळीही अशीच काहीशी स्थिती आहे. मानवाच्या सुखासाठी गेली अनेक वर्षे झटणारा हा वटवृक्ष वाचावा यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.



संदेश पारकर म्हणाले , महामार्ग चौपदरीकरणात उध्वस्त होणाऱ्यांसाठी एकजुटिने लढावे लागेल. राजकारणात आता 'मॅनेज 'संस्कृति आली आहे. त्यामुळे जनतेचे नुकसान होत आहे. गोव्यासारख्या राज्यात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी राजकीय इच्छाशक्ति असते. तशी इथे असायला हवी .तरच येथील जनतेला न्याय मिळेल. या वटवृक्षा जवळ 1 जानेवारी रोजी सत्यनारायणाची पूजा असते. यावर्षीची पूजा होईपर्यन्त हा वटवृक्ष येथून हटवू नये. अशी येथील नागरिक , व्यापारी यांची मागणी आहे. त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लढ्यात आपण सर्वांसोबत राहू.

समीर नलावडे म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक राजकरणी एकत्र आले आहेत. हे सर्व राजकरणी नागरिकांसह या अगोदर एकत्र आले असते तर कणकवली वासियांवर होत असलेला अन्याय टाळता आला असता. मात्र, आता वेळ निघुन गेलेली आहे. तरी उध्वस्त होणारे व्यापारी, विक्रेते, रिक्षा व्यावसायिक यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे , आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच प्रयत्न केले जातील.

राजन तेली म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणात जेवढे वृक्ष तोडले जातील त्याच्या पाच पट वृक्ष लावण्याचे नियोजन शासनाने केले आहे. प्रकल्प बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित बैठक घ्यावी. त्यासाठी येथे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घ्यावा.

परशुराम उपरकर म्हणाले, महामार्ग प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने आम्ही नेहमीच रहाणार असून त्यांच्या सोबत प्रत्येक संघर्षाच्या वेळी राहू . त्याना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.
राजस रेगे, पंकज दळी यांनी वटवृक्षाच्या आठवणी जागविताना कविता सादर केल्या. तर बाळू मेस्त्री यांची कविता वाचून दाखविण्यात आली.

सूत्रसंचालन सुहास वरुणकर यांनी केले. तसेच विलास तायशेट्ये यांचे मनोगत वाचून दाखविले. डॉ. शमिता बिरमोळे,  जयेश धुमाळे , उदय वरवडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. चित्रकार नामानंद मोडक आणि सहकाऱ्यानी या वटवृक्षाला सुशोभित करीत विविध 'स्लोगन' द्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

वटवृक्ष स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न करा !

कणकवलीकर सात्विक आणि लढवय्ये म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपली पराभूत मनोवृत्ती सोडून कणकवलीकरानी पर्यावरणाचा विचार करून हा वटवृक्ष स्थलांतरित करुन त्याचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करावेत. येथील राजकीय नेत्यांनी या लढ़याचे नेतृत्व करावे. कणकवलीतील या वटवृक्षाचा निरोप समारंभ करण्यापेक्षा त्याला वाचविण्यासाठी चळवळ निर्माण करा. असे आवाहन डॉ. नितिन शेट्ये यांनी यावेळी केले.

आरती आणि गाऱ्हाणे !

आठवणीतील हिंदोळ्यावर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री महापुरुषाची आरती करण्यात आली. तर वटवृक्षासह देवतेचे हे स्थान टिकण्यासाठी मालवणी पध्दतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. विलास खानोलकर यानी हे गाऱ्हाणे घातले. त्याला 'होय म्हाराजा' असे म्हणत उपस्थितानी प्रतिसाद दिला.

 

Web Title: The feelings expressed by the people of Kankavlivali ramley memories, bypassing the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.