सांस्कृतिक वारसा वृध्दिंगत होण्यासाठीच महोत्सव : नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:22 PM2019-02-04T18:22:55+5:302019-02-04T18:24:11+5:30
मुंबई - पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठ मोठे सांस्कृतिक कार्यक्रम माज्या कणकवलीवासीयांना पहाता यावेत. यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृध्दिंगत करण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली : मुंबई - पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठ मोठे सांस्कृतिक कार्यक्रम माज्या कणकवलीवासीयांना पहाता यावेत. यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृध्दिंगत करण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप सोहळ्याच्यावेळी रविवारी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेते सोनू सूद , दिग्दर्शक राकेश कोठारे , नगराध्यक्ष समीर नलावडे , संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड, अबीद नाईक , अभिजित मुसळे, मेघा गांगण, सुप्रीया नलावडे, अजय गांगण, प्रणिता पाताडे, महैंद्र सांब्रेकर, विराज भोसले, बंडू हर्णे , संदीप नलावडे आदी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, कणकवली शहराचे राज्यात फार मोठे महत्व आहे. तसेच एक वेगळा आब आणि नाव आहे. हे शहर विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तसेच नागरीकांना सवोर्तोपरी सेवा देण्यासाठी मी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर आहे. कणकवलीतील प्रत्येक नागरिकाचे समाधान व्हावे हा आपला नेहमीच प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नितेश राणे दबंग नेते...!
आमदार नितेश राणे यांचे कार्य एखाद्या दबंग नेत्याप्रमाणे आहे. त्यांच्यासारखे काम करणारा नेता मी बघितला नाही. नितेश राणे तुम्ही लोकोपयोगी कार्य करत राहा आणि आम्हाला कधीपण हाक द्या . तुमच्या हाकेला आमची नेहमीच साथ असेल . तुमच्यासारखे काम आम्हाला जमणार नाही. तुम्ही जे कार्य करतात ते कार्य आमच्या गावी करण्यासाठी तुम्हाला लवकरच घेऊन जाणार आहे. असे गौरवोद्गार सिनेअभिनेता सोनू सूद यानी यावेळी काढले. तसेच महोत्सवाला झालेली गर्दी पाहून कणकवली वासीयांचे प्रेम असेच आमच्यावर राहो .असेही ते यावेळी म्हणाले.