कणकवली झेंडा चौकात भीषण आग; ३ दुकानांसह राहत्या घराला आगीची झळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 08:18 AM2021-01-04T08:18:12+5:302021-01-04T08:19:18+5:30

कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला.

Fierce fire at Kankavali Zenda Chowk; A fire broke out in a house with 3 shops | कणकवली झेंडा चौकात भीषण आग; ३ दुकानांसह राहत्या घराला आगीची झळ 

कणकवली झेंडा चौकात भीषण आग; ३ दुकानांसह राहत्या घराला आगीची झळ 

googlenewsNext

कणकवली : कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला. यात कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले असून त्याशेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा व आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले . तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही या आगीची झळ पोहचली . यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सकाळपर्यंत पूर्णतः आग आटोक्यात आली नव्हती . 

दरम्यान , कणकवली झेंडा चौक येथील ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत . या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने लागली असावी , असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे .  याबाबत अधिक माहिती अशी की पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणात धुराचे व आगीचे लोट येवू लागले . त्या शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती इतर शेजाऱ्यांना दिली . तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.

तसेच या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला गिळकृत करतानाच ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली . त्याचप्रमाणे अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट पसरले होते . त्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने नगरपंचायतचा अग्नीशामक बंब घटनास्थळी पाठविला. बंब दाखल होताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . 

दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आग फैलावू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले . मात्र , आग आटोक्यात येत नव्हती . 
भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरू झाल्याने आकाशात धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या . नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर , पोलीस निरीक्षक संजय धुमाळ , भाई साटम , प्रसाद अंधारी , अमित सापळे , नाना सापळे , प्रद्युम मुंज , बापू पारकर , हर्षल अंधारी , आदित्य सापळे , आशिष वालावलकर आदी नागरिक तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी मदत कार्य केले .  या आगीत दुकान मालक आबा उचले , राजेंद्र बजाजी , नाथा अंधारी यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे . तर आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली नगरपंचायतबरोबर मालवण , सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता . मात्र हे बंब येण्यास वेळ लागणार असल्याने तसेच शेजारील घरे दाटीवाटीने असल्याने जेसीबीच्या साहाय्याने नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Web Title: Fierce fire at Kankavali Zenda Chowk; A fire broke out in a house with 3 shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.