पाचव्या दिवशी ८४ अर्ज दाखल
By admin | Published: February 6, 2017 12:35 AM2017-02-06T00:35:42+5:302017-02-06T00:35:42+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक : आजपर्यंत १७८ नामनिर्देशनपत्र प्राप्त
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी रविवारी जिल्हा परिषदेसाठी ३० तर पंचायत समित्यांसाठी ५४ अर्ज असे एकूण ८४ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. रविवारी पाचव्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ४९ तर पंचायत समित्यांसाठी ७८ असे एकूण १२७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही तास राहिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवार अखेरपर्यंत जिल्हा परिषदेसाठी २९६ अर्ज तर पंचायत समित्यांसाठी ४९३ उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ४९ तर पंचायत समितीसाठी निवडणूक लढविणाऱ्या ७८ उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रिंट काढून त्या त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले आहेत. रविवारी पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ३० तर पंचायत समित्यांसाठी ५४ अर्ज असे एकूण ८४ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत.
यामध्ये वैभववाडी पंचायत समिती गणातील उंबर्डेसाठी १ तर कोळपेसाठी २ अर्ज सादर करण्यात आले आहेत.
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद फोंडा, कलमठ व नाटळसाठी प्रत्येकी १ अर्ज तर पंचायत समिती कासार्डे, बिडवाडी, लोरे, वरवडे, कलमठ, नाटळ प्रत्येकी १ अर्ज आणि नरडवेसाठी २ अर्ज, देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पुरळ, बापर्डे, शिरगाव प्रत्येकी एक अर्ज व पडेलसाठी दोन अर्ज तर पंचायत समिती तिर्लोट, पडेल, बापर्डे, तळवडे, किंजवडे प्रत्येकी एक व पडेल दोन अर्ज.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा दोन अर्ज तर रेडी पंचायत समितीसाठी एक अर्ज, सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद माडखोल, कोलगांव, तळवडे, माजगाव, मळेवाड प्रत्येकी एक अर्ज तर पंचायत समिती माडखोल, कारिवडे, कोलगांव, मळगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, शेर्ले प्रत्येकी एक तर आंबोलीसाठी तीन अर्ज, दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद मणेरी दोन, साटेली-भेडशी तीन, माटणे एक अर्ज तर पंचायत समिती कोलझर, मणेरी, माटणे प्रत्येकी दोन, साटेली-भेडशी, झरेबांबर प्रत्येकी तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)