लांजात पाचव्या दिवशी सर्वाधिक ३४ अर्ज दाखल

By admin | Published: February 6, 2017 12:39 AM2017-02-06T00:39:33+5:302017-02-06T00:39:33+5:30

काँग्रेसतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन : जिल्हा परिषदेसाठी १०, पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

For the fifth day, the highest number of 34 filed for filing nominations | लांजात पाचव्या दिवशी सर्वाधिक ३४ अर्ज दाखल

लांजात पाचव्या दिवशी सर्वाधिक ३४ अर्ज दाखल

Next

लांजा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या आजच्या (रविवार) पाचव्या दिवशी सर्वाधिक म्हणजे एकूण ३४ अर्ज लांजा तालुक्यात दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १० तर पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले तर शिवसेनेनेदेखील शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न केला.
पाचव्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने निवडणूक प्रशासनानेही जय्यत तयारी केली होती. रविवारी एकूण ३४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये देवधे जिल्हा परिषद गटातून काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आघाडीचे उमेदवार प्रभाकर टोळे, देवधे गणातून सेनेच्या मानसी सिद्धेश्वर आंबोकर, बसपामधून सविता बाळकृष्ण आगरे तर शारदा शंकर गुरव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. वेरवली बु. गणातून बसपामधून मिथुन अशोक कांबळे, सेनेकडून श्रीकांत नाना कांबळे, भाजपकडून अशोक सखाराम जाधव, भाजपचा डमी प्रसाद प्रभाकर जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भांबेड जिल्हा परिषद गटातून बसपातर्फे सविता बाळकृष्ण आगरे, सेनेकडून पूजा सुरेश नामे, भाजपकडून सोनिया शंकर गांधी, प्रभानवल्ली पंचायत समिती गणातून नीलम मांडवकर, भांबेड पंचायत समिती गणातून बसपामधून छाया जाधव, अजिमा खामकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. वाकेड गटातून बसपातर्फे सविता आग्रे, सेनेकडून पूजा आंबोळकर, काँग्रेसकडून अश्विनी पन्हळेकर, वाकेड गणातून बसपामधून सुरेश कांबळे, सेनेकडून अनिल कसबले, साटवली गणातून बसपाकडून समिता कांबळे, काँग्रेसकडून सुप्रिया माजळकर, सेनेकडून स्मिता बाणे यांनी तर स्मिता दळवी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. गवाणे गटातून बविआकडून सृष्टी रेवाळे, सेनेकडून स्वरुपा साळवी, गवाणे गणातून बसपामधून चंद्रकांत गीते, काँग्रेसकडून मुनाफ दसुरकर, सेनेकडून लक्ष्मण मोर्ये, खानवली गणातून बसपाकडून चंद्रकांत गीते, सेनेकडून संजय घडशी, काँग्रेसकडून विश्वनाथ चौगुले, प्रकाश कदम, विनायक खानविलकर यांनी अर्ज दाखल केले. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: For the fifth day, the highest number of 34 filed for filing nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.