६0 प्रस्तावांना अखेर मान्यता
By Admin | Published: February 17, 2016 01:07 AM2016-02-17T01:07:09+5:302016-02-17T01:07:34+5:30
वृद्ध कलाकार मानधन : एप्रिल २0१५ पासूनचे थकीत मिळणार
सिंधुदुर्गनगरी : रखडलेले वृद्ध कलाकार मानधनाचे प्रस्ताव मंजुरी करण्यासंदर्भात शासनाला अखेर जाग आली आहे. सन २०१२-१३ मधील वृद्ध कलाकारांच्या ६० प्रस्तावांना सांस्कृतिक कार्य संचनालय यांनी मान्यता दिल्याने या कलाकारांना एप्रिल २०१५ पासूनचे थकीत मानधन मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १० लाख ८० हजारांचा निधी मंजूर केला आहे. या कलाकारांना दरमहा १५०० रुपये मानधन मिळणार आहे. असे असले तरी २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील १२० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
वृद्ध कलाकारांना उतारवयात उदरनिर्वाह करता यावा, यासाठी शासनामार्फत मानधन देण्याची प्रक्रिया सुरुकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हास्तरावर या प्रस्तावांना मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी शासनस्तरावर पाठविण्यात आले होते. सन २०१२-१३ मध्ये ६० प्रस्ताव व त्यानंतर पुढील दोन वर्षात १२० प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांना शासनाकडून मंजुरी मिळत नव्हती. बहुतांशी कलाकारांना उतारवयात मानधन हेच जगण्याचे साधन आहे. त्यामुळे या मानधनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शासनाकडून हे प्रस्ताव मंजूर होत नव्हते.
शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे कलाकारांच्या मानधनाची रक्कम रखडली होती. सांस्कृतिक कार्य संचनालयाकडून रखडलेल्या सन २०१२-१३ च्या ६० प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे या कलाकारांना दरमहा मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यापैकी जे कलाकार हयात नाहीत, त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात हे मानधन जमा होणार आहे. (प्रतिनिधी)
...हे आहेत मंजूर झालेले प्रस्ताव
या लाभार्थ्यांमध्ये महादेव प्रभू, सुभाष मसुरकर, अंकुश पवार, परशुराम लाड, हरी परब, मधुकर रावराणे, बापू परब, तातोबा सकपाळ, गोपाळ सुतार, सखाराम शेट्ये, सोनू उगाडेकर, लाडोबा राणे, विश्वनाथ कदम, राघोबा गावडे, विजय राऊळ, प्रकाश सावंत, लक्ष्मण सावंत, गुरुनाथ वराडकर, राजाराम मेस्त्री, रमेश करंगुटकर, विजय परब, राघोबा चव्हाण, रुक्मिणी मसुरकर, भिकाजी सोन्सुरकर, मोहन अणसुरकर, आगापी फर्नांडिस, जयराम सावंत, प्रवीण पाटकर, अशोक मर्गज, लक्ष्मण कलिंगण, जयराम गावडे, पुंडलिक मोर्ये, चंद्रकांत भोगले, बाळकृष्ण पाटकर, अंकुश परब, रमाकांत पावसकर, चंद्रकांत मेस्त्री, चंद्रकांत शिरसाट, ज्ञानेश्वर हळदिवे, सदानंद राणे, सदानंद सुतार, नामदेव बांदल, केशव सावंत, गोविंद तावडे, गजानन राणे, कृष्णकांत कदम, प्रभाकर परब, किशोर मोरजकर, सदाशिव आळवे, बाळकृष्ण तांबे, यशवंत खोत, पांडुरंग वायंगणकर, अनंत सावंत, चंद्रकांत चव्हाण, प्रभाकर ठाकूर, गणेश लाड, काशिराम गावडे, विलास मसुरकर, लक्ष्मण गावडे, पंढरीनाथ काटकर यांचा समावेश आहे.