डिजिटायझेशनला अखेर मंजुरी

By admin | Published: January 15, 2015 08:44 PM2015-01-15T20:44:00+5:302015-01-15T23:24:20+5:30

कणकवली नगरपंचायत : सोमवारपासून प्रशासकीय काम सुरू होणार

Finalization of Digitization | डिजिटायझेशनला अखेर मंजुरी

डिजिटायझेशनला अखेर मंजुरी

Next

मिलिंद पारकर -कणकवली -नगरपंचायतीच्या दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनच्या कामासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, खासगी एजन्सीमार्फत हे काम करण्यात येणार आहे. सोमवारपासून हे काम सुरू होणार असल्याचे नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या सर्व कागदपत्रांना स्कॅन करून संगणकात साठविले जाणार आहे. या कामासाठी नगरपंचायतीने खासगी एजन्सी नेमली आहे. प्रती कागद एक रुपयाप्रमाणे हे डिजिटायझेशन केले जाणार आहे. नगरपंचायतीमध्ये सुमारे चार लाख कागद आहेत. दस्तांच्या डिजिटायझेशनमुळे कागदपत्र हवे त्यावेळी लगेच उपलब्ध होणे, गहाळ झाल्यामुळे होणारा त्रास वाचणार आहे. रोज पंधरा हजार कागदपत्र स्कॅन करण्याची खासगी एजन्सीची क्षमता आहे. येत्या सोमवारपासून हे काम सुरू होणार आहे.
पाणीमीटर बसविणार
शहरात सुमारे १५०० नळ जोडण्यात आहेत. नगरपंचायतीने शहरातील सर्व खासगी नळजोडण्यांसाठी पाणीमीटर बसविण्याचे ठरविले आहे. नगरपंचायत स्वखर्चाने मीटर बसविणार आहे. मीटर बसविल्याने पाणी वापर काटकसरीने होऊ शकतो. तसेच वापराएवढे शुल्क आकारले जाणार आहे....
अग्निशमन बंबावर सध्या अप्रशिक्षित कर्मचारी काम करतात. नगरपंचायतमधील बंब चालक आणि स्वच्छता निरीक्षक या दोन जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- प्रज्ञा खोत, नगराध्यक्षा
वीज बिलात कपात
नगरपंचायतीने शहरात अलीकडे सीएफएल दिव्यांच्या जागी एलईडी पथदीप बसविले. हायमास्टवरही एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर महिन्याचे वीज बिल २२ हजार ९६० रुपयांनी घटले आहे..

शहरातील कचरापेट्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या जागी गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या बसविल्या जाणार आहेत. त्यांचे आयुष्य पंधरा वर्षे असेल. तोपर्यंत सध्याच्या कचरापेट्या दुरुस्त करून घेण्यात येत आहेत. जलशुद्धिकरण केंद्रावर प्रशिक्षित कर्मचारी नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर जलशुद्धिकरण केंद्र सुरू करण्यात येईल.
मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी सर्व्हे केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी माफक दरात सर्व्हे करून देणाऱ्या एजन्सीचा शोध घेतला जात आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

Web Title: Finalization of Digitization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.