...अखेर ‘त्या’ युवतीला अटक

By admin | Published: March 29, 2016 10:27 PM2016-03-29T22:27:41+5:302016-03-29T23:56:20+5:30

केदार गावकर मृत्यूप्रकरण : आज न्यायालयात हजर करणार

... finally arrested the 'he' girl | ...अखेर ‘त्या’ युवतीला अटक

...अखेर ‘त्या’ युवतीला अटक

Next

मालवण : शहरातील सामाजिक कार्यकर्ते केदार गावकर मृत्यूप्रकरणी मालवण पोलिसांनी रामेश्वर कॉम्प्लेक्स येथील तेजस्विनी संजय खडपे (वय २३, मूळ रा. विठ्ठलवाडी-देवगड) हिच्यावर मालवण पोलिसांनी भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अखेर मंगळवारी सायंकाळी चौकशीअंती तेजस्विनी हिला अटक करण्यात आली असून तिला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, केदार याची पत्नी करुणा केदार गावकर हिने दिलेल्या तक्रारीनुसार तेजस्विनी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारीनुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. तसेच संशयित युवतीप्रमाणेच साक्षीदाराही तपासात महत्वाचे असणार आहेत. केदार आणि तेजस्विनी यांच्यातील कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहे. त्यामुळे गुलदस्त्यात अडकलेल्या केदार गावकर मृत्यूप्रकरणाला वेगळी दिशा मिळणार आहे. मात्र असे असले तरी पोलिसांनी मात्र ती आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे.
मालवण-वेंगुर्ले सागरी महामार्गावरील देवली येथील माळरानावर रविवारी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते केदार गावकर (वय ३५) यांचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. केदार याच्या या मृत्यूनंतर दोन दिवस मालवणात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज केदार याची पत्नी करुणा केदार गावकर (३०) हिने आज मालवण पोलीस ठाण्यात तेजस्विनी संजय खडपे हिच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल करून अटक केली.
मानसिक दबावातून आत्महत्या
केदार याची पत्नी करुणा गावकर यांनी दिलेल्या तक्रारीत ती युवती केदार याच्याकडे लग्नासाठी दडपण तसेच सतत केदारकडे लग्न आणि वस्तू, पैशांची मागणी करायची. केदार आणि तेजस्विनी यांचे अडीच वर्षापासून प्रेमप्रकरण होते. दीड वर्षापूर्वी आपल्याला हे समजल्यावर तिला दोन वेळा समजही दिलेली होती. त्यांचे प्रेमकरण थांबबे यासाठी केदार यांनी शपथही घेतली होती. मात्र त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. केदार याच्याकडे ती वारंवार लग्नाची मागणी करत होती तसेच पैसे, वस्तू यांचीही मागणी करत असे. या मानसिक दबावातून केदार याने आत्महत्यासारखे कृत्य केले, असे त्यांनी म्हटले आहे. तर केदार याने दिलेले सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
करूणा गावकर यांच्या तक्रारारीनुसार संशयित तेजस्विनी यांच्यासह केदार याच्या मित्रपरिवाराचीही चौकशी करण्यात येणार आहे. केदार याच्या नावावर असलेले गाड्यांवर कर्ज आहे. मात्र कर्जाचे हप्ते नियमित भरणा करत असल्याचे तक्रारीत म्हणत केदार याला आर्थिक दडपण नव्हते.
याबाबत गावकर यांनी पोलिसांना बँक स्टेटमेंट सादर केले आहे. आता केदार याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस तपासाची दिशा पूर्णपणे बदलली असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर येऊन पडले
आहे. (प्रतिनिधी)

पत्नीची तक्रार : तपासाची दिशा बदलणार
केदार याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तपासाची दिशा ठरणार आहे. त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. कॉल डिटेल्स तपासताना मोबाईलवरील संदेशही तपासण्यात येणार आहेत. करुणा यांच्या जबाबात केदार याला कोणतीही आर्थिक चणचण नव्हती. कर्ज व त्याचे अन्य आर्थिक व्यवहार पारदर्शक होते. असेही म्हटले आहे. त्यामुळे तेजस्विनीच्या कॉल डिटेल्स अथवा संदेशात पैशाची मागणी अथवा लग्नाचा तगादा लावल्याचे आढळल्यास तपासाची दिशा महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे दोन दिवस गुलदस्त्यात अडकलेल्या गावकर मृत्यूप्रकरणाचा तपास करणे मालवण पोलिसांना आव्हान आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ करीत आहेत.

Web Title: ... finally arrested the 'he' girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.