क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजना मंजूर

By admin | Published: May 9, 2017 06:38 PM2017-05-09T18:38:55+5:302017-05-09T18:38:55+5:30

विहीत मर्यादेत अनुदान मंजूर

The financial assistance scheme approved for the creation of sports facilities | क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजना मंजूर

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजना मंजूर

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : राज्यात दजेर्दार क्रीडा सुविधा निर्मिती करुन त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दजार्चे खेळाडू घडावेत या उद्देशाने राज्य शासनाने क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य नावाची योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी व क्रीडा साहित्य खरेदीसाठी शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्यस्तरावरुन आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामध्ये क्रीडांगणे विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृह उभारणे, क्रीडा सुविधा तयार करणे व विविध खेळांचे टिकाऊ व अटिकाऊ स्वरुपाचे क्रीडा साहित्य खरेदी करणे इ. बांबीकरिता शासनाच्या विहीत मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येते.

सन २0१७-१८ या वर्षा करिता पात्र शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, युवा मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दिनांक २0 मे २0१७ पूर्वी सादर करावेत. याबाबतचा शासन निर्णय, विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या या ब्लॉगवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Web Title: The financial assistance scheme approved for the creation of sports facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.