दीपावलीपर्यंत चिपी विमानतळाचे काम पूर्ण करा

By Admin | Published: April 5, 2017 04:45 PM2017-04-05T16:45:59+5:302017-04-05T16:45:59+5:30

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यास ूचना

Finish the Chipi airport to Deepawali | दीपावलीपर्यंत चिपी विमानतळाचे काम पूर्ण करा

दीपावलीपर्यंत चिपी विमानतळाचे काम पूर्ण करा

googlenewsNext

लोकमत आॅनलाईन

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : पावसाळ्यानंतर दीपावलीपासून पर्यटन हंगाम सुरु होतो. या दृष्टीने दीपावली दरम्यान चिपी विमातळावर पर्यटकांचे विमान लँड होण्याच्या दृष्टीकोनातून अधिकारी वर्गाने प्रयत्नशील रहावे. धावपट्टी, कंट्रोल टॉवर, प्रशासकीय इमारत आदी आवश्यक गरजेच्या इमारतींची बांधकामांची पूर्तता करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चिपी विमातळाच्या कार्यक्षेत्रास भेट देत कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. आय. आर. बी. कंपनीचे व्यवस्थापक राजेश लोणकर, प्रकल्प अधिकारी सुहास पाटील, जनसंपर्क अधिकारी योगेश म्हेत्रे यांनी विमानतळ प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.


या भेटी नंतर परुळे येथील प्रथमेश सामंत यांच्या कॉटेज प्रकल्पास पर्यटनमंत्री रावल यांनी भेट दिली. सामंत यांच्या कॉटेज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारच्या कॉटेज उभारुन तरुणांनी स्वत:चा पर्यटन उद्योग उभारावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.


वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट


पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवकांनी व पदाधिकारी- अधिकारी यांनी वेंगुर्ला शहर पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. प्रारंभी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हापूस आंब्याचे कलम, शाल श्रीफळ देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला. उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, वेंगुर्ला नगरपालिकेचे नगरसेवक- नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.


वेळागर वासियांच्या समस्यांचे निराकरण करु


वेंगुर्ला नजिकच्या सागरेश्वर सागर किना-याची पाहणी करुन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शिरोडा- वेळागर सागर किना-यास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी सर्वे क्रमांक ३९ मध्ये ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी केली. याचबरोबर इतर अनुषंगिक समस्यांही मंत्री महोदयांनी जाणून घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. टाटामार्फत लवकरच वेळागर प्रकल्पाचे काम सुरु केले जाईल. ग्रामस्थांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहन करुन पर्यटनमंत्री रावल यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची निराकरण केले जाईल असे स्पष्ट करुन ग्रामस्थांनी नाष्टा- भोजन याचबरोबर सागरी सुरक्षा, वॉटर स्पोर्टस प्रकारात सहकार्य करण्याचे आवाहन केले. या भेटीपूर्वी मान्यवरांचे उपस्थितीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तिंबलो ग्रुपच्या आरवली टाक येथील प्रकल्पाची पाहणी करुन हा पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प दीपावलीपूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली.


या प्रसंगी अशोक तिंबलो, पर्यटन महामंडळाचे सह व्यवस्थापक आशुतोष राठोड, वरीष्ठ व्यवस्थापक जगदीश चव्हाण, प्रकल्प अधिकारी दीपक माने, सल्लागर किरण सुलाखे तसेच आरवली ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Finish the Chipi airport to Deepawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.