उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 07:06 PM2019-07-04T19:06:20+5:302019-07-04T19:09:51+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्यानं आंघोळ घातली.

FIR has been registered against Congress MLA Nitesh Narayan Rane | उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा दाखल

उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा दाखल

Next

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्यानं आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.


आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत  शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते.

कणकवली शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र  गायकवाड, संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, शहराध्यक्ष राकेश राणे, नगरसेवक अभिजित मुसळे, संदीप नलावडे, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, गटनेते संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, सभापती सुजाता हळदिवे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, पंचायत समिती  सदस्य मिलींद मेस्त्री, निखील आचरेकर, सचिन पारधीये, किशोर राणे आदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केली.
 

Web Title: FIR has been registered against Congress MLA Nitesh Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.