कणकवलीत बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:46 AM2022-02-18T11:46:59+5:302022-02-18T11:48:06+5:30
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
कणकवली: कणकवली शहरालगत कलमठ नाडकर्णीनगर येथे असलेल्या बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग लागली. आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयाला आज सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीमुळे बीएसएनएलच्या कार्यालयातील केबल जळाल्या. यामुळे आग अजूनही धुमसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीएसएनएलचे कर्मचारी गणेश वाघाटे यांनी नगरपंचायत अग्निशमन बंबाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शिशिर परुळेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले.
नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे बीएसएनएलच्या सेवेवर परिणाम झाला आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले याची अद्याप माहिती समोर आली नाही.