नानेली येथे मध्यरात्री घरात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:57 PM2021-03-23T19:57:33+5:302021-03-23T19:59:06+5:30
Fire Sindhudurg- नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या घराला पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी या घरात खरूडे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. मात्र, त्यांच्या घराशेजारीच राहणार्या भावाच्या पत्नीने आग लागल्याचे पाहिले व घरात जात या दोघांनाही उठविले. मध्यरात्री घरात घडलेल्या या अग्नितांडवात सुलोचना खरूडे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे गाढ झोपेत असलेल्या दोघांचे प्राण वाचले.
माणगांव : नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या घराला पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी या घरात खरूडे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. मात्र, त्यांच्या घराशेजारीच राहणार्या भावाच्या पत्नीने आग लागल्याचे पाहिले व घरात जात या दोघांनाही उठविले. मध्यरात्री घरात घडलेल्या या अग्नितांडवात सुलोचना खरूडे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे गाढ झोपेत असलेल्या दोघांचे प्राण वाचले.
नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या शेजारी राहणार्या भावाची पत्नी सुलोचना रमेश खरूडे या पहाटे ३.३० च्या सुमारास बाहेर आल्या होत्या. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या घराच्या पडवीत त्यांना आगीच्या ज्वाळा दृष्टीस पडल्या. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या घराच्या पडवीत आग लागली असल्याचे लक्षात आले.
यावर त्यांनी तत्काळ जाऊन ज्ञानेश्वर व त्यांची पत्नी या दोघांनाही उठविले. आरडाओरडा केल्यानंतर शेजारील व्यक्तींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व बाजूलाच असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा वापर करीत ही आग आटोक्यात आणली.
भाऊ अनिल व आनंद तसेच शेजारील व्यक्तींनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, यात घराची पडवी व घराचा अर्धा भाग जळून खाक झाला. तसेच घरातील कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले. या घटनेदरम्यान घरात असलेला सिलेंडर प्रसंगावधान राखत बाहेर आणला. अन्यथा आग घरात भडकून नुकसान झाले असते.
सतर्कतेमुळे अर्धे घर वाचवण्यात यश आले. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. घराच्या पडवीतून आग वर आली. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर सरपंच प्रज्ञेश धुरी यांनी तलाठी आर. बी. ढवळ यांना या घटनेची माहिती देताच त्यांनी पंचनामा केला.