कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 12:15 PM2021-04-26T12:15:55+5:302021-04-26T12:19:02+5:30

Fire Sindhudurg : कणकवली शहरातील शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळून बेचिराख झाला आहे . रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली .

A fire broke out in Kankavali and the world was on fire | कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात

कणकवली येथे हजारे यांच्या घरातील साहित्य आगीमुळे बेचिराख झाले.

Next
ठळक मुद्दे कणकवलीत आग लागून संसार बेचिराख,  अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यातनगराध्यक्ष समीर नलावडेंकडून त्या महिलेला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत

कणकवली : कणकवली शहरातील शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेत्या महिलेचा अख्खा संसारच जळून बेचिराख झाला आहे . रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली .

नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणली . मात्र, या आगीत हजारे यांचे मोठे नुकसान झाले आहे . या घटनेची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक कन्हैया पारकर , शिवसेना पदाधिकारी सचिन सावंत , चेतन मुंज, रिमेश चव्हाण व नगरपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रेश्मा हजारे हीने आपल्या घरात देव्हाऱ्याजवळ दिवा लावला होता. तसेच ती घरकाम करीत होती. याच दरम्यान अचानक खोलीतील कपडे व गादीने पेट घेतला . त्यामुळे खोलीत सर्वत्र धुर पसरला होता. त्या खोलीतून येत असलेला धूर पाहून त्या कॉम्प्लेक्सच्या आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत नगरपंचायतला घटनेची माहिती दिली.

नगरपंचायतचा अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. तसेच विशेष प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली . मात्र , तोपर्यंत हजारे यांच्या घरातील कपडे आणि अन्य वस्तू या आगीत बेचिराख झाल्या . आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी गणेश लाड , प्रकाश राठोड , विनोद जाधव यांच्यासह अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले . दरम्यान, आगीत हजारे यांचा संपूर्ण संसारच बेचिराख झाल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांना ५ हजारांची तातडीची मदत केली.


 

Web Title: A fire broke out in Kankavali and the world was on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.