Crime News -माणगाव येथे घराला आग; कागदपत्रे खाक; रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 05:24 PM2019-11-29T17:24:35+5:302019-11-29T17:27:17+5:30

गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याची माहिती बुधवारी वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपासकामास सुरुवात केली.

Fire at house at Mangaon Check the documents | Crime News -माणगाव येथे घराला आग; कागदपत्रे खाक; रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

Crime News -माणगाव येथे घराला आग; कागदपत्रे खाक; रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

Next

माणगाव : माणगाव येथील सावित्री जाधव या वृद्धेच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील टीव्ही व इलेक्ट्रॉनिक साहीत्य तसेच शासकीय कागदपत्रे जळून खाक झाली. 

सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती गावचे पोलीस पाटील झोरे यांनी दिली. आगीची माहिती मिळताच शेजाºयांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कुटुंबाला देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी सावित्री जाधव या एकट्याच घरात होत्या. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

  • वनविभागाची कारवाई : ३0 पर्यंत वनकोठडी, सोशल मीडियावरील व्हिडिओ आला अंगलट


मालवण : रानडुकरांची शिकार करून त्याचे सोपस्कार पूर्ण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची गंभीर दखल वनविभागाने घेत गुरुवारी पहाटेच सुरेश रामचंद्र मापारी (५६, रा. वेरळ) व राजाराम अंकुश नेरुरकर (५८, रा. विरण) या दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना कुडाळ येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्यांची नावे तपासात पुढे येतील त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.

गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याची माहिती बुधवारी वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपासकामास सुरुवात केली.
यात गुरुवारी पहाटे रानडुकरांची शिकार करणाऱ्या सुरेश रामचंद्र मापारी व राजाराम अंकुश नेरुरकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
वेरळ येथील एका विहिरीत १४ रानडुकरे पडली होती. शिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारले. त्यानुसार संशयित दोन शिकाºयांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.
याबाबतचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे हे करीत आहेत.

 

Web Title: Fire at house at Mangaon Check the documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.