देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीला रवाना; एक डझनच्या पेटीला २,५०० रुपयांचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 07:53 AM2024-12-01T07:53:45+5:302024-12-01T07:58:45+5:30
कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो. यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकविणे हे खूप कठीण बनत चालले आहे.
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या.
या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला २,५०० रुपये इतका दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानात सातत्याने वारंवार होणारा बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो. यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकविणे हे खूप कठीण बनत चालले आहे.
मोहोर टिकवण्यासाठी धडपड
अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधुंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता. हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळूनही बऱ्याच वेळा पडला.
मात्र, आलेला मोहोर टिकविण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती. यात त्यांना यशही आले. त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा, यासाठी कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पीक जपण्याचा प्रयत्न केला.
देवगड हापूसची मागणी वाढली
पहिली आंब्याची पेटी पाठविण्याचा मान धुरी यांना या वर्षीच्या देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे. यावर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या सांगली येथे पाठविल्या. यातील एका डझनच्या पेटीला २,५०० रुपये याप्रमाणे दोन हापूसच्या पेट्यांना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे यावेळी धुरी यांनी सांगितले. दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढलेली दिसत आहे.