Corona vaccine Sindhudurg : सिंधूदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:04 PM2021-05-11T19:04:59+5:302021-05-11T19:06:12+5:30
Corona vaccine Sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 9 हजार 435 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 439 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 417 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 796 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 48 हजार 259 व्यक्तींनी पहिला डोस तर 16 हजार 582 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.
45 वर्षावरील 32 हजार 728 नागरिकांनी पहिला डोस तर 3 हजार 418 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 40 हजार 526 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 930 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 22 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 36 हजार 450 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 5 हजार 263 कोविशिल्ड आणि 35 हजार 263 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 40 हजार 526 डोस देण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 13 हजार 170 लसी असून त्यापैकी 12 हजार 950 कोविशिल्डच्या तर 220 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 5 हजार 940 लसी स्टोअरमध्ये असून 5 हजार 900 कोविशिल्डच्या आणि 40 कोवॅक्सिनच्या आहेत.