Corona vaccine Sindhudurg :  जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:08 PM2021-05-20T18:08:49+5:302021-05-20T18:09:46+5:30

Corona vaccine Sindhudurg :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

The first dose was taken by 1 lakh 31 thousand people in Sindhudurg district | Corona vaccine Sindhudurg :  जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Corona vaccine Sindhudurg :  जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोसजिल्ह्यात सध्या 3 हजार 930 लसी शिल्लक

सिंधुदुर्ग  :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण 9 हजार 486 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 607 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 797 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 90 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 56 हजार 735 व्यक्तींनी पहिला डोस तर 20 हजार 540 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 44 हजार 834 नागरिकांनी पहिला डोस तर 5 हजार 57 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 67 हजार 598 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 890 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 29 हजार 280 लसी या कोविशिल्डच्या तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 30 हजार 672 कोविशिल्ड आणि 36 हजार 926 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 67 हजार 598 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 800 लसी असून त्यापैकी 150 कोविशिल्डच्या तर 1 हजार 650 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 3 हजार 930 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 1 हजार 920 लसी आणि कोवॅक्सीनच्या 2 हजार 10 लसी शिल्लक आहेत.

Web Title: The first dose was taken by 1 lakh 31 thousand people in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.