वेंगुर्ले तालुक्यातून पहिली केशर आंबा पेटी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:21 PM2018-11-27T20:21:30+5:302018-11-27T20:24:03+5:30
नवी मुंबईच्या मार्केटला आंबा पेटी रवाना
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातून पहिली केशर आंबा पेटी येथील रामेश्वर आंबा सर्व्हिस येथून नवी मुंबई-वाशी मार्केटला शुक्रवारी रवाना झाली. वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व आंबा बागायतदार यशवंत परब आणि दिलीप परब यांच्या वेंगुर्ले शहरातील गोठण या भागातील आंबा बागेत तयार झालेल्या केशर आंब्याची पाच डझनी नगांची एक आणि दोन डझन केशर अशा दोन पेट्या जनार्दन पडवळ यांच्या रामेश्वर आंबा सर्व्हिसने वाशी मार्केटला रवाना केले.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या मोहरापासून हे आंबा पीक लवकर तयार झाल्याची माहिती आंबा बागायतदार परब यांनी दिली. आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना करताना रामेश्वर आंबा सर्व्हिसचे मालक जनार्दन पडवळ, बागायतदार प्रताप आसोलकर, राधाकृष्ण मांजरेकर, चंद्रमोहन कुबल, उत्तम केरकर, मोहन नाईक, रंगनाथ भाईडकर, राजू परुळेकर उपस्थित होते.