भाजपच्या मतावर जिंकलेल्या खासदारकीचा प्रथम राजीनामा द्या ! -- प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 03:54 PM2019-11-21T15:54:34+5:302019-11-21T15:56:20+5:30
तारीख पे तारीख ' देणार्या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ?
कणकवली : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन पक्षांचे सरकार म्हणजे ' तिन पायांची शर्यत , तीन पैशाचा तमाशा ' होणार आहे. महायुतीच्या नावाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवायची आणि भाजपच्या दोन लाख मतांच्या जोरावर विजयी व्हायचे आणि आता भाजपवर टीका करायची हे बरे नव्हे. एवढेच भाजप जर तुम्हाला नकोसे वाटत असेल तर प्रथम भाजपच्या जिवावर विजयी झालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर टीका करा आणि निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येऊन दाखवा असे खुले आव्हान भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.
कणकवली येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतुक संघटना जिल्हाध्यक्ष शिशीर परुळेकर, सुरेश सावंत उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले, ' तारीख पे तारीख ' देणार्या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ? असा सवाल करतानाच जठार म्हणाले, लोकसभा निवडणुक लढताना महायुतीची गरज होती . मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असे जेव्हा तुम्हाला वाटले , तेव्हा युती नकोशी झाली. असे का ?
शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदारानी राजीनामे द्यावे व भाजपशिवाय निवडुन येऊन दाखवावे. हे खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांना आमचे आव्हान आहे. भाजपबाबत एवढी नाक मुरडता मग तुम्हाला भाजपच्या जीवावर मिळालेली खासदारकी कशी चालते ? महाराष्ट्रात तुम्ही सत्ता स्थापन करा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत . परंतु हे सरकार तीन वर्षे तरी टिकेल का ? याचा विचार करा.
खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एवढ्यावेळा भेटले आहेत की, जेवढी भेट खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची झाली नसेल. याचाच अर्थ शिवसेना सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जावू शकते असा होतो . शिवसेनेचे ६३ आमदार आज घाबरलेल्या स्थितीत आहेत. शिवसेना आमदारांचे म्हणणे आहे कि, आम्हाला काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दावणीला बांधु नका. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आपल्या भवितव्याची काळजी करत आहेत. मात्र आमच्या भवितव्याचे काय ? असा साधासोपा प्रश्न या आमदारांना पडला असल्याचे प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.
'पोटात एक आणि बाहेर एक' असे का?
शिवसेनेने खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना विरोधी बाकावर बसणार हे निश्चित झाले. मग खासदारांची सभागृहात बसण्याची जागा बदलण्यात आली यात काय चुकले ? त्याविषयावरून भाजपवर टीका करणाऱ्यांनी
शिवसेनेच्या ' पोटात एक आणि बाहेर एक' अशी भूमिका का? याचे उत्तर द्यावे . असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.