नरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:43 PM2019-12-13T15:43:30+5:302019-12-13T15:44:46+5:30

नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

First, tackle the problems of Nardway dam victims: Demand for Sandesh Parker | नरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी

ओरोस येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची नरडवे प्रकल्पग्रस्तांसह संदेश पारकर यांनी भेट घेऊन चर्चा केली.

Next
ठळक मुद्देनरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची घेतली प्रकल्पग्रस्तांसह भेट

कणकवली : नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नरडवे प्रकल्पग्रस्तांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची ओरोस येथे भेट घेऊन समस्यांबाबत बुधवारी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर ढवळ, सुरेश ढवळ, जयराम ढवळ, मारूती ढवळ, मधुकर पालव, प्रकाश सावंत, गणेश ढवळ, वैभव नार्वेकर आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांचे अनेक मुद्दे आहेत. त्याची सोडवणूक होणे आवश्यक आहे. २० वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ३२ कोटिंचा हा प्रकल्प काहि हजार कोटिंवर जाऊन पोहोचला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त आजहि वाऱ्यावर आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी भूखंड देण्यात आलेले नाहित. पुनर्वसन गावठाणे तयार करण्यात आलेली आहेत, तेथे सुविधाही नाहित. प्रकल्पग्रस्ताना पर्यायी जमिनीचे वाटप झालेले नाही . ९६४ घरांचे मुल्यांकन करण्याची कार्यवाहि झालेली नाही.

ज्यांना उत्पनाचे कोणतेही साधन नाही. अशा प्रकल्पग्रस्तानी करायचे काय? त्यामुळे या समस्या सर्व प्रथम मार्गी लावा व नंतरच काम सुरू करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तानी काम बंद पाडले. मात्र, तरीहि कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी काम सुरू करण्यात आले आहे. हे योग्य नव्हे.

वास्तविक अगोदर ठरल्यानुसार प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबतची कार्यवाहि होणे आवश्यक होते. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. दरम्यान , प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. असेही संदेश पारकर यांनी या म्हटले आहे.
 

Web Title: First, tackle the problems of Nardway dam victims: Demand for Sandesh Parker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.