स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रशासन पोहोचणार करुळ केगदवाडीवर

By admin | Published: December 10, 2015 10:16 PM2015-12-10T22:16:43+5:302015-12-10T22:16:43+5:30

तहसीलदार घेणार आढावा : खातेप्रमुखांच्या उपस्थितीत १७ ला बैठक--लोकमत इफेक्ट

For the first time since independence, the administration has reached Karol Kagadwadi | स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रशासन पोहोचणार करुळ केगदवाडीवर

स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रशासन पोहोचणार करुळ केगदवाडीवर

Next

वैभववाडी : वनखात्याच्या जमिनीमुळे सव्वाशे वर्षांपासून जीवनावश्यक सुविधांसाठी झगडणाऱ्या करुळ केगदवाडीचे भयाण वास्तव ‘लोकमत’ ने जगासमोर मांडल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी तालुका प्रशासन प्रथमच येत्या गुरुवारी केगदवाडीवर पोहोचणार आहे.
वैभववाडी तहसीलदारांनी १७ रोजी सकाळी ११ वाजता वन व महावितरणसह सर्व खातेप्रमुखाची बैठक करुळ केगदवाडी येथे आयोजित केली आहे. त्यामुळे पाच पिढ्यांपासून वीज, रस्ता व पाणी या मुलभूत सुविधेच्या प्रतिक्षेत संघर्ष करणाऱ्या केगदवाडीतील धनगर समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अकरा कुटुंबांच्या सुमारे ७0-७५ लोकसंख्येची करुळ केगदवाडी नामक वस्ती चहूबाजूंनी वनखात्याच्या जंगलाने वेढलेली आहे. त्यामुळे या वस्तीवर अद्याप वीज, रस्ता व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सरकारी योजना पोहोचलेला नाही. या जीवनावश्यक सुविधांअभावी तेथील जनतेच्या जीवनमानावर परिणाम झालेला दिसून येतो या समस्यांबाबत येथील रहिवाशी कित्येक वर्षांपासून शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. तेथील रहिवाशांनी वीज आणि रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने तहसीलदारांना निवेदनाद्वारे सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर १0 नोव्हेंबरला करुळ गावात प्रशासनाने आयोजित केलेल्या सिंधु समाधान योजनेच्या कार्यक्रमातही केगदवाडीच्या रहिवाशांनी वन खात्याच्या जमिनीमुळे होणाऱ्या वनवासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते आणि लोकमतने २२ नोव्हेंबरला व्यथा मांडली होती. त्यामुळे तहसीलदार गावीत यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यांनी येत्या गुरुवारी १७ रोजी वन, महावितरणसह गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, बांधकाम, पाणीपुरवठा विभागांच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीत केगदवाडी येथे खास बैठक आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)

या बैठकीत वनखात्याकडून ठोस भूमिका घेऊन विविध खात्याच्या अखत्यारीतील योजनाचा केगदवाडीचा विकास आराखडा बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
- जी. आर. गावीत, तहसीलदार

Web Title: For the first time since independence, the administration has reached Karol Kagadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.